चंद्रपूर जिल्हातील बाधीताची संख्या ४४ !



शहरात तुकूम परिसरात मिळाला आणखी एक पॉझिटीव्ह !

(चंद्रपूर कोरोना अपडेट)

चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरात आणखी एक कोरोना बाधित आढळून आला आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या ४४ झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमित्रा नगर तुकुम परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात आयएलआय संशयित ५७ वर्षाच्या नागरिकांमध्ये सौम्य लक्षणे दिसल्यामुळे काल त्यांच्या स्वॅब नमुन्याची तपासणी करण्यात आली होती.

आज या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
चंद्रपूर शहरांमध्ये यापूर्वी बुधवारी तुकूम परिसरातील सुमित्रा नगर भागातीलच रहिवासी असणारे ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आलेल्या बाधीतामुळे महानगरपालिका यंत्रणेने तपासणी मोहीम आणखी सखोल केली आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) ९ जून ( एकूण ३ बाधीत ) १०जून ( एक बाधीत ) आणि १३ जून ( एक बाधीत ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४४ झाले आहेत.आतापर्यत २३ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४४ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता २१ झाली आहे.

Post a Comment

0 Comments