(चंद्रपूर कोरोना अपडेट)
- २८६ कोरोनातून बरे ; १६० वर उपचार सुरु !
- २४ तासात नव्या १९ बाधितांची नोंद !
चंद्रपूर दि. २८ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४४७ झाली आहे. २८६ बाधित बरे झाले असून १६१बाधितावर उपचार सुरू आहेत.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने आज मंगळवार दि. २८ जुलै २०२० संध्याकाळी ७.४० वाजता दिलेल्या माहितीनुसार पुढे आलेल्या १९ बाधितामध्ये चंद्रपूर शहरातील नागरिकांचा अधिक समावेश आहे . यामध्ये श्वसनाच्या गंभीर आजारातून पॉझिटिव ठरलेल्या नागरिकाचा समावेश आहे. रामनगर परिसरातील ३५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. याशिवाय नाकोडा चंद्रपूर येथील ३५ वर्षाच्या पुरुषाचा संपर्कातून स्वॅब पॉझिटिव्ह आल्याचे पुढे आले आहे. श्वसणाच्या गंभीर आजारातून बल्लारपूर येथील 48 वर्षीय महिला तपासणी अंती पॉझिटिव्ह आली आहे. चंद्रपूर शहरातील गिरणार चौक येथील पोलिस कॉर्टर मधील 25 वर्षीय महिला व 23 वर्षीय पोलीस संपर्कातून पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. राजुरा येथील 51 वर्षीय आणखी एक पोलीस जवान पॉझिटिव्ह आल्याचे पुढे आले आहे. काल राजुरा येथूनच ५१ वर्षीय पोलीस जवान पॉझिटिव्ह आला होता. चंद्रपूर शहरातील राजीव गांधी नगर शामनगर या परिसरातील संपर्कातून २२ वर्षीय युवक बाधित ठरला आहे. तर जगन्नाथ बाबा मंदिर परिसरातील ६ वर्षीय मुलगा व ६ वर्षीय मुलगी ही देखील संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. तुकूम परिसरातील ५५ वर्षीय नागरिक संपर्कातून पॉझिटिव्ह ठरलेला आहे. गिरणार चौक चंद्रपूर येथील श्वसनाच्या गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या नागरिकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. चंद्रपूर शहरातील चोर खिडकी परिसरातील अनुक्रमे ७७,२३ २२ व २० वर्षीय चार महिला संपर्कातून पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. चिमूर तालुक्यातील महावाडी गावातील यापूर्वीच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३२ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. चिमूर तालुक्यातील केवडा या गावाचा 19 वर्षीय युवक हा देखील संपर्कातून पॉझिटीव्ह आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बोधा येथील २२ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला आहे.
आजच्या १९ पॉझिटिव्हमुळे कालपर्यंत ४२८ असणारी संख्या एकूण १९ ने वाढवून ४४७ झाली आहे.
तेलंगाना येथील एका महिलेचा २४ जुलैला मृत्यू झाला. तिचा स्वॅप चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आला होता. याशिवाय एका महिलेला कोरोना शिवाय अन्य आजाराच्या गंभीरते मुळे नागपूरला हलविण्यात आले आहे. या दोन पॉझिटिव्हमुळे चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह संख्या ४४७ झाली आहे.
0 Comments