बहुरिया हत्या प्रकरणात आरोपींना 15 पर्यंत पोलिस कोठडी !



  1. अस्तित्वासाठी च्या लढाईत बल्लारपूरात गॅंगवार मध्ये सुरज बहुरिया जागीच ठार !
  2. बल्लारपुरात आज ही तणाव !
  3. चार आरोपींनी केले आत्मसमर्पण!

बल्लारपूर : शनिवार दि. 8 ऑगस्ट ला सूरज बहुरिया यांची भररस्त्यात गोळी घालून हत्या करण्यात आली. बल्लारपूर शहर हादरले असून अस्तित्वाच्या लढाईसाठी शहरात गॅंगवॉर सुरू झाल्याची चर्चा आहे. घटनेनंतर अमन आदेवार, चिन्ना आदेवार यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी आत्मसमर्पण केले होते. आज आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना शनिवार 15 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. महत्वाचे म्हणजे हत्याकांड घडल्यानंतर बल्लारपूर शहरात तणाव निर्माण झाला होता. हा तणाव निखळण्यासाठी पोलिसांना फार मोठी कसरत करावी लागली. मृतक सुरज बहुरिया यांचा आज जन्मदिन आहे त्यानिमित्त शहरात त्यांचे बॅनर लागले आहेत व आज त्यांचे अंतिम संस्कार होणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये "भावनेची किनार" असल्यामुळे आजही बल्लारपूर शहरात तणाव निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुरज बहुरिया हे कोळशाच्या व्यवसायात सक्रिय होते. बल्लारपूर मध्ये कोळसा व्यापारी म्हणून त्यांचे मोठे प्रस्थ होते, अशा मध्ये बहेरिया सुद्धा सामील होते. ज्या आरोपींचा या हत्याकांडात समावेश आहे ते सुरज बहरिया यांचे पार्टनर म्हणून संबोधले जात होते. त्यांच्याच विश्वासाच्या माणसांनी त्यांचीच केलेली हत्या ही अस्तित्वासाठीच्या लढाईत स्वतःची प्रस्थ निर्माण करण्यासाठी करण्यात आलेले आहे असे सांगण्यात येत आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार संचारबंदी नंतर कोळशाच्या व्यापार हा ठप्प झाला असून दारूच्या सुरू असलेला व्यापार बल्लारपुरात वाढविण्यासाठी व त्याची लिंक बल्लारपूरमध्ये जोडण्यासाठी प्रयत्न सुरू होते, त्या प्रयत्नात चिन्ना आपले पाय रोवू पाहत होता. त्यासाठी सुरत बहेरिया यांच्या याला विरोध असल्यामुळे त्यांना संपवून याठिकाणी "नवा गडी, नवा राज" स्थापण व्हावा व स्वत:चे वेगळे प्रस्थ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितल्या जात आहे. योजना बद्दल माहिती घडविण्यात आलेला या हत्या प्रकरणात सूत्रधार अजूनही मोकळा असल्याची चर्चा बल्लारपुर रंगली आहे. कोळशाच्या व्यवसायातील जुनेजाणते आता आपले वजन दारूच्या व्यवसायात प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे त्याला विरोध करणाऱ्यांना संपवून आपला "नवा राज" निर्माण करण्यांचा रोषामध्ये सुरज बहुरिया यांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची चर्चा आहे. अल्पसंख्यांक व बहुसंख्याक अशीही या ठिकाणी लढाई होती असे ही वृत्त हाती आले आहे. अपराधी प्रवृत्तीचे सुरज बहुरिया यापूर्वी बल्लारपूर शहरातून तडीपार सुद्धा झाले आहेत. सुरज बहुरिया यांच्या हत्येनंतर बल्लारपूर मध्ये तणाव निर्माण झाला होता. आज नऊ ऑगस्ट रोजी बहुरिया यांच्या जन्म दिवस असल्यामुळे त्यांचे गावांमध्ये मोठे बॅनर लागले आहेत तसेच आरोपी चिन्ना यांच्या आठ ऑगस्ट रोजी जन्मदिवस होता, व त्यांचे ही बॅनर बॅनर बल्लारपूर शहरात झळकले आहेत. "जन्मदिन मरण दिन होगा" असे स्टेटस ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. याचाच अर्थ झालेले हत्याकांड हे नियोजनबद्ध त्या घडले आहे. भविष्यात याचे परिणाम काय असू शकतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
शनिवार दि. 8 अॉगस्ट च्या दुपारी 3 वाजताच्या दरम्यानात बल्लारपूर कडून बामणी कडे MH34-AM-1958 या मारुती स्विफ्ट गाडी जात असताना, गाडीत बसलेल्या कोळसा व्यापारी सुरज बहुरिया नामक युवकावर भर दिवसा शहरातील जुना बस स्टॅन्ड परिसरातील चौक , हाॅटेल अरबीक समोर गोळीबार झाला असल्याची घटना घडल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
अस्तित्वाच्या लढाईत सुरज बहुरिया वर बंदुकीने गोळी झाडून खून करण्यात आला. अंदाजे सहा ते सात गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात सुरज चा जागीच मृत्यू झाला त्यानंतर आरोपीने स्वतः आत्मसमर्पण केले.

Post a Comment

0 Comments