गुन्‍हेगारीच्‍या घटना व अवैध व्‍यवसायांवर त्‍वरित प्रतिबंध न घातल्‍यास जनआंदोलन छेडणार-भाजपाचा इशारा !चंद्रपूर जिल्‍हयात माफीया राज !

चंद्रपूर जिल्‍हयात मोठया प्रमाणावर गुन्‍हेगारीच्‍या घटनांमध्‍ये वाढ होत असुन अवैध व्‍यवसायांना सुध्‍दा उत आलेला आहे. या जिल्‍हयात माफीया राज निर्माण झाले असुन वेळीच यावर आळा न घातल्‍यास जिल्‍हयात अराजक निर्माण होईल. हा धोका लक्षात घेता तातडीने यावर आळा घालण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करावी अन्‍यथा भाजपा तर्फे तिव्र जनआंदोलन छेडण्‍याचा इशारा देण्‍यात आला आहे.

दि. 08 ऑगस्‍ट रोजी बल्‍लारपुर शहरात गँगवारची घटना घडली असुन यात एका व्‍यक्‍तीवर नकाबधारी समुहाने गोळीबार केला. नागभीड येथे एका अल्‍पवयीन मुलीवर सामुहीक अत्‍याचार झाल्‍यामुळे तिने आत्‍महत्‍या केली. दारुची मोठया प्रमाणावर तस्‍करी जिल्‍हयात सुरु आहे. अवैध व्‍यवसायांच्‍या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्‍हयात नागरीक असुरक्षित आहेत. विशेषतः महिला व मुलींच्‍या सुरक्षितते समोर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे. कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न जिल्‍हयात निर्माण झाला आहे. पोलिस प्रशासनाचे याकडे अक्षम्‍य दुर्लक्ष होत आहे. यावर वेळीच प्रतिबंध घालणे आवश्‍यक आहे. या संदर्भात जिलहाधिकारी, पोलिस अधिक्षक यांनी तातडीने लक्ष देण्‍याची आवश्‍यकता आहे. याबाबत गांभीर्याने दखल न घेतल्‍यास भाजपा तर्फे जनआंदोलन छेडण्‍याचा इशारा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, जिल्‍हाध्‍यक्ष (महानगर) डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, उपाध्‍यक्षा सौ. रेखा कारेकर, चंद्रपूरच्‍या महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, संजय गजपुरे, ब्रिजभुषण पाझारे, सौ. रेणुका दुधे आदींनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments