कुरखेड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी भ्रष्ट सोनटक्के यांच्या वाफाऱ्या !



  • सगळ्यांनाच विकत घेण्याची माजलेल्या सोनटक्के ची भाषा!

कूरखेडा (प्रति.) : कुरखेडा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांचे भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्यानंतर व निरनिराळ्या न्यूज पोर्टल वर आलेले वृत्त व विदर्भ राज्य ग्रामीण व शहरी पत्रकार संघटनेने केलेल्या तक्रारीनंतर त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. या चौकशी ने पिसाळलेल्या सुनील सोनटक्के आपण सगळ्यांनाच विकत घेऊ शकतो असल्या *"तोऱ्यात"* वागणे सुरू केले आहे. विभागीय चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयाची *"बिदागी"* दिली, यातून आपण निर्दोष सिद्ध होऊ असे खुलेआम हा आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाच सांगत सुटला आहे. पत्रकारांना व तक्रारकर्त्यांना याचा कुणीतरी *"मामु""* सांभाळतो असे हा स्वत: सांगतो. आता हा "मामू" आपण स्वतः पत्रकार आहे असे डिंग मिरवितो. प्रामाणिक अधिकारी व पत्रकार यांचा लिलाव होत नाही, बहुतेक भ्रष्ट सोनटक्के विसरला असेल. भ्रष्टाचार संपविणे हे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाच्या हातात नाही, पण त्याला उजागर करणे व भ्रष्टाचाराला वाचा फोडणे व शासनाच्या व प्रशासनाचा समोर मांडण्याचा प्रयत्न वृत्तपत्र आणि पत्रकार करीत असतात. भ्रष्ट अधिकारी खिशात सामावू शकतात परंतु पत्रकारांना विकत घेणे असली भाषा सोनटक्के सारख्या *"भ्रष्ट"* अधिकाऱ्याने करावी हे तर *"लई झाले"* भ्रष्टाचार झाला की किंवा केला मग त्याला सामोरे जाऊन त्याच्याशी सामना करायला हवा. सोनटक्के सारखे वन अधिकारी हे महाराष्ट्रामधील सगळ्यात जास्त वन क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत आहे व भ्रष्टाचारवर पडदा पाडण्यासाठी आपल्या *"काळ्या पैशाच्या"* जोरावर *"फुदकत"* असेल तर हे घातक आहे.

थोडसे सोनटक्के विषयी...!


निवृत्तीला बराच अवधी असलेला हा सोनटक्के भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे काहीही न करता कागदावर काय दाखवले जाते यामध्ये याचा हातखंडा आहे. जुनी राजकीय पार्श्वभूमी असल्याचे हा स्वतः सांगतो. रोपवाटिका असो, वनक्षेत्रातील रस्ता असो, वनपरिक्षेत्र अंतर्गत येणारी कोणतीही काम असो निधी कसा हडपायचा व *"तो"* भी मंत्री माझाचं आणि *"हा"* भी मंत्री माझाचं अशी *"मंत्र्यांना"* ही आपल्या खिशात घेवून फिरण्याची भ्रष्टाचारी सोनटक्के याची भूमिका विघातक आहे. नोकरीला अवघा काही अवधी पार पडला आहे परंतु गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण जंगल विकण्याची क्षमता या सोनटक्के मध्ये आहे, असे या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. सोनटक्के यांच्या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी झाल्यास वनविभागातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हाच राहील, यात काहीही शंका नाही. विदर्भ राज्य ग्रामीण व शहरी पत्रकार संघ सोनटक्के यांच्या जुन्या व नविन प्रकरणांचा शेवटपर्यंत वरिष्ठ स्तरापर्यंत पत्रव्यवहार व पाठपुरावा करेल व या सोनटक्के ला त्याचा भ्रष्टाचाराबद्दल नक्कीच योग्य ते शासन होईल यात तिळमात्र शंका नाही.

Post a Comment

0 Comments