शहरातील नेहरू नगर येथे अवैध दारू चा महापुर !



  1. चंद्रपूर रामनगर पुलिस स्टेशन हद्दीतील प्रकार !
  2. या पुढे दारू विकणाऱ्या व पिणाऱ्यांची गय केली जाणार नाही !
  3. डीएमए च्या पत्रकार परिषदेत इशारा !
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हात दारूबंदी झाल्यापासून अवैधधंद्याला उधाण आले आहे. असाच प्रकार चंद्रपूर महागरतील नेहरूनगर येथे गवळी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अवैध दारू विकेत्याकडून होत आहे. यापुढे दारू विकणारे व दारू पिणाऱ्यांचा बंदोबस्त नेहरू नगरातील-वार्डातील नागरीकच करतील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा डिजिटल मीडिया एसोसिएशन च्या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ता प्रमोद तिवारी, शेषराव सोलंकी, उमेश सालुंखे, विनोद गुजर, दिनेश मोरे, अरूण भिसे, अरविंद भगाडे, उमेश गुजर, या सोबत नेहरू नगरामधील नागरिकांनी दिला.

तसेच चंद्रपुरातून अवैध दारू घेण्यासाठी अनेक नागरिक नेहरू नगरात येतात, त्यामुळे सध्या थैमान घातलेला कोरोना आजार ही या परिसरात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध दारू विक्रीमुळे संपूर्ण प्रभागाचे वातावरण दूषित होत आहे. समाजात तेढ निर्माण होवू लढाई भांडण होत आहे, त्यामुळे येथील अवैध दारू विक्री बंद करावी, अशी मागणी नेहरू नगरावासियांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे, हा गैरप्रकार त्वरित थांबला नाही नेहरू नगरवासी याचा बंदोबस्त आपल्या पद्धतीने करतील असे त्यांनी पत्रकार परिषद सांगितले आहे.
याबरोबरच शहरात स्लम एरियामध्ये (गरीब बस्ती) अनेक बाल-गुन्हेगार या व्यवसायात सक्रीय झाले आहेत.
नेहरू नगरामधील अवैध दारू विक्री रोखण्यासाठी नेहरू नगरातील नागरिकांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने अवैध दारू विक्री व्यवसायाला वेग आला आहे. नागरिक दिवसभर कष्ट करूनही त्यांची मुले- मुली आपल्या महिलांना सुरक्षित ठेवू शकत नाहीत, याकडे पोलिस प्रशासनाने आवर्जून लक्ष द्यावे, असे आवाहन ही पत्रकार परिषदेत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments