- माजी खासदार नरेश पुगलिया व इतर दोघांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
चंद्रपूर महानगरपालिका, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांना नोटीस !
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध आरोग्य सुविधांचा अभाव व अन्य अनेक समस्या असल्यामुळे कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. माजी खासदार नरेश पुगलिया व इतर दोघांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती द्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, राज्याच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रधान सचिव, केंद्रीय ड्रग्ज स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, चंद्रपूर महानगरपालिका, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी आवश्यक खाटा व कोरोना रुग्णालये उपलब्ध नाहीत. जिल्ह्यात जीवनरक्षक औषधांचा तुटवडा आहे. कोरोना चाचणी सुविधा अपुऱ्या आहेत. चाचणीचे निदानही अचूक येत नाही, असे अनेक आरोप या याचिकेत करण्यात आले आहे.
0 Comments