सुगंधित तंबाखुचे अन्य ठोक व्यापारी अद्याप ही मोकाट !



राज्यामध्ये बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय जिल्ह्यात सुरू आहे. करोडो रूपयांची या व्यवसायात उलाढाल असून अनेक मोठे व्यापारी व्यवसायात गुंतले असल्याचे सांगण्यात येते. नुकतीच अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करून वसीम रिझवी यांचेवर पडोली पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कारवाईनंतर हे प्रकरण फौजदारी गुन्ह्यासाठी त्या-त्या पोलिस स्टेशनकडे वळते केल्या जाते, त्यानंतर या व्यापाऱ्यांवर कारवाईच्या नावांने सोपस्कार पार पाडले जातात. त्यामुळे करोडो च्या या व्यवसायात अनेकांनी आपले पाय रोवले आहे. या व्यापाऱ्यांना राजाश्रय प्राप्त असल्याचे सांगण्यात येते. शहरातील अनेक सफेदपोश या व्यवहारात सक्रिय आहेत. नागपूर येथून या व्यवसायाचे धागेदोरे जुळले असून शहरातील मध्यभागामध्ये सुगंधित तंबाखूचा साठा केला जातो, परंतु त्याकडे पोलिस विभागाचे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. सुगंधित तंबाखूवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिस विभागाला सुद्धा आहे. परंतु पोलिस विभागाचे लक्ष फक्त दारू, कोळसा याकडेचं असल्याचे दिसते. करोडो रूपयांची उलाढाल असलेल्या सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर पोलिस विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी आता होवू लागली आहे.

  • वसीम रिझवी च्या गोडाऊन वर धाडीत ८ लाखाचा प्रतिबंधीत पानमसाला जप्त !
  • अन्न प्रशासन विभागाची मोठी कारवाई !

गुरूवार दि. ३ डिसेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील विशेष पथकाचे नागपूर विभाग पथक प्रमुख नितीन मोहिते, सहाय्यक आयुक्त अन्न व चंद्रपूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी अ. या. सोनटक्के, जी. टी. सातकर व प्र. अ उमप यांनी वसीम अख्तर झिमरी यांचे गोडाऊन प्लॉट नं. ई६९, दाताळा एमआयडीसी, चंद्रपूर यांचेकडून (रजनीगंधा पान मसाला १२९.६ गॅ., २२ नग, वजन २.८५, किंमत रु. ११ हजार ८८०, विमल पान मसाला ९९ गॅ., ३८ नग, वजन ३.७६, किंमत रु.४ हजार ५६०, मजा हुक्का शिशा तंबाखु २०० गॅ. १०७२ नग, वजन २१४.४, किंमत ८० हजार ९३६०) एकंदर ८ लाख २५ हजार ८०० किंमतीचा साठा ताब्यात घेतलेला आहे. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन, पडोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून १ एप्रिल २०२० ते ३१ ऑक्टोंबर या कालावधीत ५८ लाख ४८ हजार ३८८ चा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाची ही मोठी कारवाई असून यामुळे सुगंधित तंबाखू विकणाऱ्यांमध्ये नक्कीच धडकी भरली आहे, यात संशय नाही.

Post a Comment

0 Comments