गडचांदूरातील हत्यार पळविण्यातील दुसऱ्या बाजुची गडचांदूरात चर्चा !  • अवघ्या काही तासातचं परप्रांतातील आरोपींना पोलिसांनी केली अटक!

  • जिल्हा पोलिसांची अभुतपूर्व कारवाई !

कोरपना (वि.प्रति.)
राजुरा तालुक्यातील हरदोना येथील रहिवासी असलेल्या गंगा नारायण मेघवंशी यांच्या घरी चोरीचा बेत आखून त्यांच्या घरातील परवाना असलेली बारा बोअरची बंदूक, चार चाकी वाहन व इतर साहित्य लुटून परप्रांतात जाणाऱ्या प्रदीप शोरान उर्फ अजित शोरान (२३), आनंद सतबीरसिंग (२३, रा. तालु, ता. बवानी खेडा, जि. भवानी), जयप्रकाश विजेंदर सिंग (२६, रा. माडीदोगी, धर्मशाळा, जि. रोहतक) या हरियाणाच्या तिन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश सिमेवरील देवलापार येथून ताब्यात घेतले. अवघ्या काही तासातचं या आरोपींना अटक करण्यात जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले, ही जिल्हा पोलिसांची अभूतपूर्व अशी कारवाई आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास गडचांदूर पोलिस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक करीत आहे.

गडचांदूरात घटनेच्या दुसऱ्या बाजुची चर्चा !
गडचांदूर शहरात या घटनेच्या दुसऱ्या बाजुची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. गडचांदूर शहरामध्ये प्रवेशापूर्वी राजुरा तालुक्यात येणारे हरदोना (बुज) हे गांव ! या गावामध्ये नारायण मेघवंश यांची विधवा पत्नी आपल्या मुलांसोबत राहते. त्यांच्याकडे परवाना असलेली १२ बोअरची बंदूक होती. गंगाबाई या विधवा महिलेला त्यांच्याच घरात बंदुकीचा धाक दाखवून पैशाची मागणी हरियाणातील या तिन युवकांकडून करण्यात आली. गंगाबाई या विधवेचा घरी चोरीचा बेत 'पवन' व अन्य एका युवकाने आखला, त्यासाठी परप्रांतातून सुपारी देऊन युवकांना पाचारण करण्यात आले असल्याची ही प्राथमिक स्टोरी सांगण्यात येत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या "पवन"कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अवघ्या काही तासात ताब्यात घेतले. हाती आलेल्या वृत्तानुसार, ज्या मेघवंशी कुटूंबात ही घटना घडली, त्यांच्याच कुटुंबातील "पवन" हा "गडी(नोकर)" माणूस ! मागील काही दिवसांपासून ताब्यात घेतलेले आरोपी हे याच "पवन"च्या घरी मुक्कामास असल्याची माहिती आहे. घरातील "गडी" माणूस परप्रांतातून चोरी करण्याचे उद्देशाने आरोपींना बोलावितो आणि स्वतःच्याच घरी ठेवतो, ही बाब गडचांदुर वासियांच्या पचनी पडत नाही आहे, त्यामुळे या घटनेच्या दुसऱ्या बाजुचा ही गडचांदूर चे उपविभागीय पोलिस अधिक्षक सुशीलकुमार नायक यांनी तपास करायला हवा.


कोण हा "नारायण मामा" !

हरदोना येथील गंगा नारायण मेघवंशी या विधवेच्या घरी हे प्रकरण घडले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे पती नारायण यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. त्यांचेकडे ही परवाना असलेली बंदुक होती. त्यांचा व्यवसाय हा त्या पद्धतीचा असल्यामुळे त्यांना बंदुकीचा अधिकृत परवाना मिळाला होता. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या वादातित कुटूंबामध्ये कधी कुणीही पडले नाही. प्रकरण 'विशाल' असल्याचे सांगण्यात येते. आजूबाजूच्या परिसरात "नारायण मामा" या नावाने हे गृहस्थ ओळखले जायचे.

योग्य तपास झाल्यास मोठे
घबाड उघडकीस येण्याची शक्यता !

हरदोना येथील रायफल चोरी प्रकरणाचा योग्य तपास झाल्यास महाराष्ट्रामधील मोठे घबाड उघडकीस येण्याचे शक्यता असल्याची दबकी चर्चा आज कोरपना व राजूरा तालुक्यामध्ये सुरू आहे. नैसर्गिक खनिज संपत्तीने लबालब भरलेला कोरपना व राजुरा तालुका ! या तालुक्यांमध्ये जी खनिज संपत्ती आहे, ती अत्यंत मोलाची आहे. निसर्गाने दिलेल्या या खनिज संपत्तीची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात आहे. शासन दरबारी या दोन्ही तालुक्यातील खनिज संपत्ती नोंद आहे. त्यातून महसूल स्वरूपात मिळणारे उत्पन्न हे उत्पन्न हे तोडगे आहे, परंतु शासनाच्या दरबारी या ठिकाणी असलेल्या खनिज संपत्तीची नोंद आहे, पोलिसांनी हा प्रकार सुद्धा तपासात घ्यायला हवा.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपासात लक्ष घालायला हवे !गडचांदूरात परवानाधारक हत्यार पळविण्याच्या घटनेला फक्त अपराधिक वृत्तीतून किंवा सामान्य असलेली घटना न समजता त्याची विस्तृत चौकशी करायला हवी, ही बाब या वृत्तात घेण्याचे महत्वाचे कारण म्हणजे नुकतेच राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून सुत्र सांभाळलेले हेमंत नगराळे यांची पहिली पोस्टींग ही चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे झाली होती. अत्यंत कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. तसेच गडचांदूर नुकतेच उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून लाभलेले व या प्रकरणाचे तपास अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी ही पोलिस विभागाचा "श्री-गणेशा" हा राजुरा तालुक्यातून केलेला आहे. त्यामुळे राजुरा तालुका हा या अधिकाऱ्यांसाठी नविन नाही. या प्रकरणाचा योग्य तपास झाल्यास महाराष्ट्रातील मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी चर्चा राजुरा व कोरपना तालुक्यामध्ये सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसांत हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागलेले आहे.

Post a Comment

0 Comments