'तो' दुसरा 'पवन' तो नाहीचं !



राजुरा : हरदोना येथून दोन दिवसांपूर्वी बंदूक पळविणाऱ्यांना पोलिसांनी काही तासातचं अटक केली. यासंबंधात विदर्भ आठवडी पोर्टल ने 'गडचांदूरातील हत्यार पळविण्यातील दुसऱ्या बाजुची गडचांदूरात चर्चा!' या मथळ्याखाली विश्लेषणात्मक वृत्त प्रकाशित केले. या वृत्तामध्ये 'तो दुसरा पवन कोण?' या सब हेडींग खाली प्रकाशित झालेल्या छोट्याश्या वृत्ताला काही षडयंत्रकारी व उपद्रवी मंडळींनी त्या वृत्ताशी व प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या एका निर्दोष 'पवन' ला टार्गेट करीत ते वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल करीत संबंध नसलेल्या 'पवन' ला मानसिक त्रास देण्याचा धडाका चालविला. त्या वृत्ताच्या माध्यमातून नाहक एका 'पवन' नावाच्या इसमाला दुखावण्याचा काहींनी प्रयत्न केला, षडयंत्रकारी व उपद्रवी मंडळींनी असा प्रयत्न करून आपला खालचा स्तर दाखविला असून त्या वृत्तामुळे कुणा निर्दोष किंवा बेकसूर व्यक्तीला वृत्ताच्या माध्यमातून दुखावण्याचा त्या वृत्ताचा हेतू नव्हता. उपद्रवी मंडळींनी असले निरालजेपणाचे कृत्य करण्याचा कुणीही मुळीच प्रयत्न करू नये. एखाद्या वृत्ताचा आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावून दुसऱ्या कुण्या घटनेशी संबंध जोडून कुणाला दुखावण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. वृत्त लिहीण्यामागे कुणाची नाहक बदनामी करणे हा उद्देश नव्हता, याची उपद्रवी मंडळींनी जाणिव ठेवावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या