'त्या' राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे !
कंत्राटदाराला संबंधित
अभियंत्यांची 'अर्थ'पूर्ण साथ !

चंद्रपूर : महाराष्ट्र-छत्तीसगड सिमाक्षेत्रातील मुरूमगांव-धानोरा-गडचिरोली-सावली-मुल-चंद्रपूर ला जोडणारा एनएच-९३० या मार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे काम असून संबंधित अभियंत्यांची कंत्राटदाराला 'अर्थ'पूर्ण साथ असल्यामुळे यात होणाऱ्या भ्रष्टाचाराकडे संबंधित अधिकारी जाणिवपूर्वक कानाडोळा करीत आहेत.

सविस्तर वृत्त असे की, मुरुमगांव ते चंद्रपूर ला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम २०१७ पासून सुरू आहे. २३४.०२ किमी ते २७३.७१९ किमी असे ३९.६७ किमी ची लांबी असलेले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. रस्ता बनवितांना साहित्याची कोणतीही गुणवत्ता चाचणी न करता या कामाला मुर्त रूप देण्याचे "अहम पाप" कंत्राटदारांकडून होत असून या "पापा" मध्ये राष्ट्रीय महामार्गाचे अभियंते "लिप्त" असून त्यांची संपूर्ण साथ कंत्राटदाराला आहे.

या रस्त्याचे कंत्राटदार हे एक मोठे आसामी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या रस्त्याच्या निकृष्ट कार्याकडे आर्थिक देवाण-घेवाणीतून संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
रस्ता बनण्यापूर्वीच उखडला जात आहे. वेळेपूर्वी काम होत नसल्यामूळे त्याची वाढीव किंमत कंत्राटदार अधिकाऱ्यांना सोबत घेवून पचवित आहे, निकृष्ट दर्जाचे साहित्य या कामात वापरल्या जात आहे, गुणवत्ता तपासणीची जबाबदारी ज्या विभागाची आहे, तोच विभाग या भ्रष्टाचारात लिप्त असल्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कार्य या ठिकाणी होत आहे. केंद्र सरकारच्या मोठा निधी हडप करण्याच्या षड्यंत्र कंत्राटदाराला भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी पूर्णपणे "साथ" देत असून "चोर-चोर मौसेरे भाई" अशी स्थिती झाली आहे. यातील भ्रष्टाचाराची योग्य चौकशी झाल्यास शासकीय अधिकाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे.

महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्गाद्वारे संपूर्ण देशाला एका साखळीत जोडण्याचे स्वप्न राष्ट्रीय दळणवळण मंत्री नाम, नितीन गडकरी यांनी बघितले. देशाला महामार्गाने एकवटण्याच्या या पवित्र कार्याला काही नतद्रष्टांकडून चुना फासला जात आहे. मुरुमगांव ते मुल-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाची ही तिच अवस्था आहे. यासंबंधात पत्रकार संघाद्वारे गडकरी यांना तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Post a Comment

0 Comments