बेड न मिळाल्याने कोरोना बाधित युवकाला बस स्टॅंडवर मृत्यूने कवटाळले !#coronabramhapuri  • पालकमंत्री नाम. वडेट्टीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील घटना !
  • लाचार आरोग्यव्यवस्था व राज्यकर्त्यांविरोधात संतापाची लाट !


चंद्रपूर/ ब्रम्हपूरी :आज रविवार दि. 18 एप्रिल रोजी ब्रह्मपुरी येथील एका 37 वर्षीय युवकाचा ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे प्रवासी निवाऱ्यात मृत्यू झाला. लाचार आरोग्यव्यवस्था वर राज्यकर्त्या विरोधात नागरिकाच्या संताप हा आता उफाळून उठला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत असून बेड, आॅक्सिजन, लस यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. उपचाराविना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.ब्रम्हपुरी हे चंद्रपूरचे पालकमंत्री नामदार वडेट्टीवार यांचा हा मतदारसंघ आहे. पालकमंत्री वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप आणि पुनर्वसन यासारखी अनेक महत्त्वाची मंत्रीपदे आहेत. मदत व पुनर्वसन सारख्या पदांवर राज्यांमध्ये ते कार्यरत आहेत परंतु जिल्ह्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आले आहे. त्यांच्या मतदारसंघाकडे त्यांनी कानाडोळा केला असून त्यांचे बस्तान हे नागपूर येथे असते असा आरोप आता होऊ लागला आहे. ब्रम्हपूरीमध्ये प्रवासी निवाऱ्यात मृत सोशल मीडियावर मृत पावलेल्या मृतकाच्या व त्याच्या कुटुंबियांच्या आकांताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमांवर निव्वळ घोषणांचा बाजार मांडणाऱ्या पालकमंत्र्यांविरोधात असंतोष धगधगत आहे.

जिल्ह्यामध्ये आत्तापावेतो मृतांची संख्येने 500 चार आकडा पार केला आहे तर चार आकड्यांमध्ये बाधितांची संख्या येत आहे. मागील वर्षी जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने वड्डेट्टीवारांनी कोरोना नियंत्रणाबाबत अनेक घोषणा केल्या, दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केलच नाहीत, त्याचीच ही परिणिती आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना ची संख्या रोखण्यास त्यावर नियंत्रण आणण्यात आरोग्ययंत्रणा सपशेल फेल झाली आहे. जिल्ह्यातील दारूबंदी हटावी यासाठी पालकमंत्री जेवढे आग्रही होते तेवढेच आक्रमक जर ते आरोग्य व्यवस्था सुधारावी, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता व्हावी यासाठी प्रयत्नशील राहिले असते तर आज परिस्थिती वेगळी असती, अशी ओरड आज जनतेमध्ये होऊ लागली आहे.

आॅक्सिजन प्लॅन्ट राजकीय अनास्थेचा बळी !
चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास सहाशे बेडला पुरेल एवढा ऑक्सिजन निर्मिती करण्याच्या प्लॅन्ट घ्या प्रस्तावाला मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. राजकीय अनास्थेमुळे एका महिन्यात पूर्ण होणारा हा ऑक्सीजन प्लांट अद्याप ही पुर्ण होऊ शकला नाही. तिच स्थिती चंद्रपूरातील महिला रुग्णालयात 100 कोरोणा रूग्णांसाठी बेड ची झाली. राजकीय अनास्था यासाठी कारणीभूत आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढल्यानंतर आता कुठे या महिला रुग्णालयात 25 बेडची व्यवस्था करण्यात आली असून येणाऱ्या काही आठवड्यात बाकीचे बेड उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. "तसाच लागली आणि विहीर खोदायला फावडा हातात" अशी ही स्थिती जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यातील वाईट अवस्था ?

एका आकडेवारीनुसार संपूर्ण देशामध्ये कोरोना रुग्णांच्या रोज येणाऱ्या संख्येमागे एक महाराष्ट्रातील असतो. चाचणीच्या येणारा रिपोर्ट हा 16 टक्के आहे. म्हणजे प्रत्येक शंभर उघडा मागे सोळा रुग्ण बाधित आढळत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे चाचणी केल्यानंतर चाचणीचा अहवाल लिहायला 72-72 तासांची वेळ लागत आहे चाचणी झाल्यापासून रिपोर्ट येईपर्यंत चाचणी झालेला व्यक्ती हा पुन्हा पुन्हा च्या संपर्कात येतो यावर नियंत्रण आणण्यात जिल्हा प्रशासनाला अपयशी ठरले आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे व उपचाराविना मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही लाजिरवाणी आहे.

Post a Comment

0 Comments