मुलच्या स्वामी विवेकानंद शाळेतील अलगीकरण कक्षात (home isolation) दुर्गंधीचे साम्राज्य, पिण्याच्या पाण्याचा अभाव !#homeisolation

  • अलगीकरणातील बाधित अन्नत्यागाच्या पावित्र्यात !

मुल : मुल तालुक्यातील स्वामी विवेकानंद शाळेमध्ये ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांसाठी अलगीकरकरणाची (home isolation) व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांना ही याच शाळेत ठेवल्या जाते. मिळालेल्या माहितीनुसार 80 ते 100 लोकांच्या अलगीकरणाची या ठिकाणी व्यवस्था आहे आणि आज हे अलगीकरण कक्ष खचाखच भरलेल्या अवस्थेत आहे. यात घाणीचे साम्राज्य असून शौचालय, बाथरूम याच्या स्वच्छतेकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.

महत्वाचे म्हणजे महिला व पुरूषांना या एकाच शाळेत वेगवेगळी अलगीकरण व्यवस्था असून संडास व बाथरूम ची व्यवस्था वेगळी असली तरी एक-एक बाथरूम व शौचालयात प्रशासनाचे साफसफाई कडे दुर्लक्ष असल्यामुळे याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे अलगीकरणातील बाधितांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मुल न.प. प्रशासनाकडून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. पाणी संपल्यानंतर तासन् तास या ठिकाणी पाण्याच्या पुरवठा होत नसल्यामुळे अलगीकरण असलेले बाधित अन्नत्याग आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याबाबत मुल नगर परिषदेचे मुख्याधिकारी मेश्राम साहेब यांना अलगीकरण बाधितांनी भ्रमणध्वनीवरून यासंदर्भात माहिती दिली असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याकडे आता वरिष्ठांनी त्वरित लक्ष देण्याची त्याठिकाणी मागणी होत आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांना होम अलगीकरण व संस्थात्मक अलगीकरण ठेवण्यात येत आहे. परंतु ग्रामीण भागात होम अलगीकरणाची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना संस्थात्मक अलगीकरण देण्यात येत आहे. संस्थात्मक हलगी करणार पोषक आहार, स्वच्छता यावर भर देण्याचे शासन निर्देश आहे परंतु याकडे संबंधित विभाग कानाडोळा करीत असतो ही बाब येणाऱ्या काळात घातक सिद्ध होऊ शकते.

Post a Comment

0 Comments