खाजगी रूग्णालयातील मृतांची संख्या कमी दाखविण्यासाठी डॉक्टरांचा प्रताप !!




  • शेवटच्या क्षणी कोविड रूग्णांना शासकीय रूग्णालयात पाठविणाऱ्या "'त्या" खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई करा !
  • कोल्हापूर च्या धर्तीवर पालकमंत्र्यांनी द्याव्या जिल्हा प्रशासनाला सूचना !!

चंद्रपूर : आठ दिवस उपचार करून शेवटच्या क्षणी कोविड रूग्णांना सरकारी रुग्णालयात पाठविण्याचा प्रताप काही खासगी रूग्णालये करत आहेत. आपल्या रुग्णालयातील मृत्यूची संख्या कमी दाखविण्यासाठी सुरू असलेल्या या कारनाम्याला आळा घालण्यासाठी "त्या" खाजगी डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांनी तशा सूचना जिल्हा प्रशासनाला द्याव्या, अशी मागणी आता चंद्रपूर जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी अशा प्रकरणावर आक्रमक होत कोल्हापूरातील अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्याच धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातही पालकमंत्र्यांनी शेवटच्या क्षणी खाजगी रूग्णालयातून शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आल्यानंतर मृत पावणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, चंद्रपूर जिल्हय़ात गेले महिनाभर कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रोज मोठ्या संख्येत रूग्ण मिळत होते आता संख्या आटोक्यात आली असून कोरोतून बरे होणाऱ्यांची संख्या समाधानकारक असली तरी मृतांच्या आकड्यात अद्याप पावतो कमतरता आली नाही, ही बाब गंभीर आहे. शासकीय रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर असल्यामुळे ग्रामीण-शहरी भागात अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात असतात. या रुग्णांना लक्षणे असल्यास त्यांना आरटीपीसीआर तपासणी करण्याच्या सूचना खासगी रुग्णालयाने द्याव्यात, असे आदेश यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र, तरीदेखील काही खासगी रुग्णालये या सूचनांचे पालन करत नाहीत. किरकोळ उपचार करत वेळ घालवतात. रूग्णाचा आजार वाढल्यानंतर शेवटच्या क्षणी त्याला सरकारी रूग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या जातात. चंद्रपूर जिल्हय़ात मृत्यूचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. सध्या अनेकांना कोरोना सदृश लक्षणे असूनही ते घरच्या घरी जुजबी उपचार घेत आहेत. त्यानंतर काही जण खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. तेथे उपचार सुरू झाल्यानंतर अनेक रूग्णांची प्रकृती बिघडते. शेवटच्या २४ ते ४८ तासांतील मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. हे मृत्यू लपविण्यासाठी खासगी रूग्णालये शेवटच्या क्षणी सरकारी रुग्णालयात रुग्णाला पाठवत आहेत. त्यामुळे काही रुग्ण दगावत असल्याचे समोर येत आहे. आपल्या रुग्णालयातील मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी ही रुग्णालये रूग्णाच्या जीवाशी खेळत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयाबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर चंद्रपुरात ही जिल्हा प्रशासनाला सूचना द्याव्यात अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.
जिल्ह्यात खाजगी रुग्णालयावर नियंत्रण करण्यासाठी एक एडिट कमिटी बनविण्यात आली असून सुद्धा खाजगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. व शेवटच्या क्षणी त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात येण्याच्या सूचना देण्यात येत आहे. "मरता क्या न करता" म्हणीप्रमाणे रुग्णांचे नातेवाईक रुग्णाला शासकीय रुग्णालयात हलवीत आहेत व त्या ठिकाणी त्याच्या दुर्दैवाने मृत्यू होत आहे यामुळे शासकीय रुग्णालय बदनाम होत असून खाजगी रुग्णालय आपली जबाबदारी झटकत असल्याचे स्पष्ट चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

Post a Comment

0 Comments