- नगरसेवक अमजद अली यांच्या नेतृत्वात महिलांनी दारू विक्रेत्यांना दिली चेतावणी !
- तक्रारी देऊनही पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप !
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील इंदिरानगर परिसरात दारूविक्रेत्यांच्या घरांवर नगरसेवक अमजद अली यांच्या नेतृत्वात आज इंदिरानगर वासियांनी हल्लाबोल केला. यावेळी नागरिकांचा रोष उफाळून निघत होता. इंदिरानगर परिसरातील बिरेंद्र शाहा, सचिन कुभारे, वंदना कुंभार, सुरेखा गोळेकर हे दारूच्या व्यवसाय करतात. या संदर्भात अनेकदा नागरिकांनी पोलिसात तक्रार केली केली असूनही पोलिस विभागातर्फे कारवाई केल्या जात नसल्यामुळे दारू विक्री त्यांची हिंमत वाढली असल्याचा आरोप नागरिक करिता आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी फक्त दारूविक्री होत असल्यामुळे मद्यपींची गर्दी जमा होते, त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याचा आरोप करित यानंतर दारूविक्री केल्यास दारू विक्रेत्यांना धडा शिकविण्यात येईल अशी चेतावणी इंदिरानगर वासियांनी दारू विक्रेत्यांना दिली. यावेळी इंदिरानगर वासियांनी पोलीस दारू विक्रेत्याकडे येऊन पैसे घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप केला. दारूविक्री त्यामुळे सदर परिसरातील वातावरण हे तापले असून त्यातून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारू विक्रेत्यांनी यासंदर्भात नागरिकांना यापूर्वी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत. त्यामुळे इंदिरानगर वासिय संतापले असून यानंतर असे प्रकार घडल्यास त्याच्या गंभीर परिणाम दारू विक्रेत्यांना भोगावा लागेल अशी चेतावणी यावेळी देण्यात आली आहे.
श्रीकृष्ण नगरातील
"स्वामी"ची दारू विक्री !
इंदिरानगर च्या शेजारी असलेल्या कृष्णनगर येथे स्वामी नावाचा एक इसमाने आपल्या स्वतःच्या घरीच दारू विक्री साठी दुकानच खोलले आहे. यासंदर्भात यापूर्वी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर 15 व 19 मे रोजी रामनगर पोलिसांनी या "स्वामी" वर कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या स्वामी चा दारूविक्री चा धंदा पूर्वीपेक्षा जोमाने सुरू असल्यामुळे पोलिसांचा वचक आता दारू विक्रेत्यांवर राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे कोरोणाच्या महामारी ने नागरिक शासन निर्देशांचे पालन करीत घरात बसले आहेत तर दुसरीकडे पर जिल्ह्यातून दारू आणून ती खुले आम विक्री केल्या जात आहे. दारू विक्रेत्यांवर मुंबई दारूबंदी कायदा व्यतिरिक्त अन्य कायद्याने ही गुन्हे दाखल करण्यात यावे. शासन निर्देशांचे पालन न करणाऱ्या दारू विक्रेत्यांवर जमावबंदी व कोविड-१९ अंतर्गत चे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.
0 Comments