शनिवार-रविवार ला विकल्या गेलेली दारू, आली कूठून ?  • अवैध दारू विक्रेत्यांना दारूचा पुरवठा करणाऱ्या परवाना धारकांवर कारवाई करण्यात यावी!
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू पूरवठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी !

!! "मसन्याउदाची भ्रमंती" !!

चंद्रपूर (मसन्याउदाची रिपोर्टींग) : शनिवार दि. १० व रविवार ११ जुलै रोजी चंद्रपूरात दारू विक्री झाली कां यासंदर्भात "मसण्याउदाने भ्रमंती" केली असता चंद्रपूरात नित्य-नेमाने दारू विक्री करण्यात आल्याचे या भ्रमंतीमध्ये ध्यानात आले. शहराच्या आत मध्येच नाही तर शहराच्या बाहेरील कमलाबाई, रोशन्या-टोशन्या सारख्या अनेकांनी या दोन दिवसात दारू विक्री केली आहे. शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात दारूविक्री करण्यात आल्याचे ध्यानात आली. या भ्रमंतीमध्ये ज्यांच्यावर यापूर्वी दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत, त्या प्रत्येकाने या दोन दिवसांमध्ये दारू विक्री केली असल्याचे "मसण्याउदा"च्या भ्रमंतीमध्ये ध्यानात आले.

दारू विक्रीसंदर्भात "मसण्याउदा"ने प्रत्यक्ष भेटी देऊन चौकशी केली असता ज्यांच्यावर दारूविक्री चे गुन्हे दाखल आहेत ते दारूविक्रेते दारू विक्री च्या कामात सक्रीय झाले होते. पाच जुलैपासून जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते चार वाजेपर्यंत परवानाधारकांकडून दारू विक्री सुरू आहे. मग चार नंतर मद्यपी किंवा दारूडे हे दारू सेवन करीत नाहीत कां? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न "मसन्याउदा"ला पडला व त्यांनी या दोन दिवसात भ्रमंती करून त्याची माहिती काढली असता चार नंतर सुद्धा दारू विक्री करण्यात येत आहे, तेच दारू विक्रेते या कार्यात सहभागी आहेत.

जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर ही दारू आली कुठून? ज्यांच्यावर यापूर्वी दारूविक्री चे गुन्हे दाखल आहेत ते प्रत्येक जण आज दारूविक्री करीत आहे. दार बंदी पुर्वी पर-जिल्ह्यातून येणारी दारू ही नोंद न होता विक्री केल्या जात होती मग आज जिल्ह्यात दारूबंदी हटल्यानंतर जिल्ह्यातील परवाना धारकांकडून हा दारू पुरवठा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दारूबंदी पूर्वी पर जिल्ह्यातून येणारी दारू बंदी असलेल्या जिल्ह्यात विक्री होत आहे हा कळीचा मुद्दा होता परंतु आता जिल्ह्यामधील अवैध दारू विक्री त्यांना परवाना धारकांकडून बेकायदेशीररित्या दारूचा पुरवठा होत असेल तर यावर त्वरित बंधन आणण्यात यावे, ज्या परवाना धारकांकडून अवैध दारू विक्रेत्यांना हा नियमबाह्य रित्या दारू पूर्वा केला जात आहे त्यांच्या मुसक्या त्वरित आवळण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दारूबंदी हटल्यानंतर पाच जुलैपासून जिल्ह्यामध्ये परवानाधारकांना दारूचा पुरवठा करण्यात येत आहे. दारुडे व मद्यपींनी याठिकाणी अमाप गर्दी करून आपला उत्साह व्यक्त केला आहे ‌. कोविड-१९ च्या नियमांची पायमल्ली जिल्ह्यात झाली आहे, याचे विविध फोटो आणि व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहे.

अवैध दारू विक्रेत्यांना दारूचा पुरवठा करणाऱ्या परवाना धारकांवर कारवाई करण्यात यावी!

चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवार दिनांक दहा जुलै रोजी परवाना धारकांच्या दुकानातून अवैध दारू विक्री त्यांना मोठ्या प्रमाणात दारूच्या पुरवठा करण्यात आला. तीच दारू शनिवार व रविवारी मद्यपींना विक्री करण्यात आली.
या पाच दिवसात मोठ्या प्रमाणात म्हणजे करोडो रुपयांमध्ये दारू विक्री करण्यात आली आहे. मग परवानाधारकांनी अवैध दारू विक्रेत्यांना बेकायदेशीररित्या ही दारू दिली कशी आणि ती जिल्ह्यात विक्री कशी करण्यात येत आहे त्याची चौकशी ही व्हायलाच हवी व संबंधित विभागाने ती अवश्य करावी. राज्य उत्पादन शुल्क विभाग व प्रामाणिक असलेला चंद्रपूर जिल्हा पोलिस विभागाने यासंदर्भात अवश्य चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करायला हवे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्री करणाऱ्या परवानाधारकांची दररोजच्या विक्रीच्या नोंदीची योग्य तपासणी केल्यास दारू पुरवठा करणाऱ्या परवानाधारकांची पितळ उघडे होऊ शकते.

Post a Comment

0 Comments