माणिकगड सिमेंट उधोगाकडून होत असलेल्या प्रदूषण चा विषय सभेला घ्या!




  • नगरसेवक अरविंद डोहे यांची नगराध्यक्षा कडे मागणी !

गडचांदूर : गडचांदूर शहराच्या आजू बाजूला चार सिमेंट उद्योग असल्याने या शहराची औद्योगिक शहर म्हणून अख्या महाराष्ट्रात ओळख आहे.
या शहराची लोकसंख्या ४० हजाराहून अधिक आहे.व या शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर माणिकगड सिमेंट उधोग आहे.सदर कँपणीच्या सिमेंट मिश्रित कणामुळे येथील नागरिकांना दमा, हार्ट, डोळ्याचा, कानाचा, त्वचेचा अशा अनेक जीवघेण्या रोगांना सामना करावा लागतो.याबाबत या उद्योगाच्या व्यवस्थापकाना तसेच स्थानिक व वरिष्ठ प्रदूषण मंडळाला नगरसेवक अरविंद डोहे यांच्या नेतृत्वात साईशांती नगर वासीने अनेकदा निवेदन दिले शेवटी आंदोलन केले.त्यानंतर काही काळ वायू प्रदूषणावर काही प्रमाणात आळा घातला होता.
परन्तु मागील एक हप्त्या पासून परत प्रदूषण होताना दिसत आहे.त्यानंतर साईशांती नगर वासींनी नगराध्यक्षांना विनंती पत्र देऊन नगर परिषद च्या सभेत विषय घ्या व ठराव मंजूर करून शासनाकडे तसेच उद्योग व्यवस्थापकाकडे
आणि प्रदूषण मंडळा कडे पाठपुरावा करावे जेणे करून होणाऱ्या प्रदूषणावर कायम स्वरूपी आळा बसेल परन्तु नगर परिषदनी आवश्यक आरोग्याचा विषय असताना विषय घेतला नाही.परन्तु आरोग्याला घातक समजणाऱ्या दारू च्या नाहरकत करिता विशेष सभा बोलावली हे सुद्धा विषेश आता परत नागरिक डोहे नगरसेवकाकडे प्रदूषणाचा तक्रारी करीत असल्याने आता परत डोहे यांनी नगराध्यक्षा कडे आगामी सभेत विषय घेण्याची विनंती वजा निवेदन दिले.आज पर्यंत अनेक समस्या बाबत तसेच काही विशेष सूचनेबाबतचे मा. नगराध्यक्ष म्याडमना पत्र दिले परन्तु कुठलीही दखल घेतली नाही.आणि त्यावर कुठले उत्तर सुद्धा देण्यात आले नाही हे विशेष..!
आज या जगामध्ये नवनवीन तंत्रज्ञान अवगत झाले असून याद्वारे देशातील कित्येक उद्योगाने वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविले आहे.परन्तु सदरचे उद्योगाचे व्यवस्थापक सर्रास दुर्लक्ष करून जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे हे विशेष आता गडचांदूर वासींनी निवडून दिलेले नगराधक्ष काय निर्णय घेतील याकडे सर्व गडचांदूर वासींचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments