सा. बां. विभागातर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न !
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त राष्ट्रपिता म. गांधी व शास्त्री जयंती दिनी...

रक्तदानासोबतचं रक्तगट, शुगर-बिपी तपासणी!

६० जणांनी केले रक्तदान, प्रथम लिपीक डाहूले यांच्या संपूर्ण कुटूंबाने रक्तदान करून ठेवला आदर्श !

चंद्रपूर (प्रति.)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त शनिवार २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती दिनी सार्वजनिक बांधकाम मंडळ, चंद्रपूर येथे रक्तदान शिबिर, रक्तगट तपासणी तसेच बीपी, शुगर तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत तर सा. बां. मंडळाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर सा.बां. विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, विभाग क्रमांक दोन चे कार्यकारी अभियंता अनंत भास्करवार व रक्त संक्रमण अधिकारी सौ. साने मॅडम यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला माल्यार्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. राठोड यांनी रक्तदानाची आजची गरज यावर मौल्यवान मार्गदर्शन केले तर साखरवाडे मॅडम यांनी आपल्या मनोगतात रक्तदानासाठी प्रत्येकाने समोर यायला हवे असे आवाहन उपस्थितांना केले. सा.बां. मंडळाचे अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी सर्वप्रथम व नंतर सा. बां. विभाग विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता सुनिल कुंभे यांनी रक्तदान करून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. दहा वाजेपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात 60 रक्तदात्यांनी रक्तदान करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रपिता म. गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती दिनी रक्तदान शिबीराचे आयोजन करून साजरा करण्यात आला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सा.बां. विभागाचे प्रथम लिपीक डाहूले यांच्या संपूर्ण कुटूंबाने या शिबीरात रक्तदान करून रक्तदानाविषयी भिती बाळगणाऱ्यांना संदेश दिला. रक्तदानासोबत रक्तगट तपासणी तसेच बी.पी. व शुगर यांचीही यावेळी तपासणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचारी या सोबतच कंत्राटदार असोसिएशनचा ही या आरोग्य शिबिरात सहभाग होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर व सा.बां. स्पोर्टस् क्लब चंद्रपूर तसेच हा.बां विभाग क्र. १ व २ चे उप अभियंता चव्हाण, संजोग मेंढे, शाखा अभियंता संजय राठोड, भट्टड, स्वप्निल राठोड, प्रथम लिपीक डाहुले यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स.अ.अ. मनोज जुनोनकर यांनी केले. या रक्तदान शिबिराला शासकीय रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी सौ. साने मॅडम व त्यांच्या चमूंची उपस्थिती होती. शासकीय रुग्णालयाच्या संपूर्ण चमूचे पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सा.बां. मंडळाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांच्या प्रेरणेने आयोजित रक्तदान शिबीराचा कार्यक्रम उत्सुर्फपणे पार पडला.

Post a Comment

0 Comments