खाडे यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे पोलीसांच्या कारवाया प्रशंसनीय !



आंतरराज्यीय गांजा माफियांकडून १०३ किलो गांजा जप्त !
स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई !


चंद्रपूर (वि.प्रति.)
खाडे यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे पोलीसांच्या कारवाया प्रशंसनीय !



चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षापासून गुन्हेगारीला ऊत आला आहे. जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाया प्रशंसनीय राहिलेले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पदभार सांभाळल्यानंतर बल्लारपूर येथील सुरज बहुरिया हत्याकांडातील बरं असलेल्या मुख्य आरोपी ला करण्यात आलेल्या अटकेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने अनेक मोठ्या घटनांच्या त्वरित उलगडा करून आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे तत्परता ही वाखाणण्याजोगी आहे. सूचना मिळताच बरोबर स्थानिक गुन्हे शाखेकडून होणारी कारवाई ही प्रशंसनीय अशीचं म्हणावी लागेल.

आज शनिवार दि.२६/०३/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातुन आंतरराज्यीय गांजा तस्कर दोन चारचाकी वाहने पर राज्यातून गांजा घेऊन चंद्रपुर शहराचे दिशेने येणार या माहितीवरून मा. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. संदीप कापडे, सचिन गदादे यांचे नेतृत्वात दोन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. त्यानुसार सापळा रचुन संशयीत वाहनांवर मुल-चंद्रपुर रोडवर चिचपल्ली गावजवळील शेर-ऐ पंजाब ढाब्याजवळ पाळत ठेवली असता काही वेळातच होंडा सिटी गाडी व मारुती स्विफ्ट गाडी या दोन गाड्या शेर-ऐ-पंजाब ढाव्याजवळ आल्या असता सापळा कारवाई नुसार वाहन चालकांना बाहेर उतरवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) श्रीनिवास नरसय्या मचेडी, वय ५० वर्ष, धंदा-शिक्षक, व २) शंकर बलय्या घंटा, वय २९ वर्ष, धंदा-मजुरी दोन्ही राहणार मस्जीद वाडा, सुभाषनगर, मथनी, करीमनगर, तेलंगणा अशी सांगितली. त्यांचे वाहनांची दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता दोन्ही वाहनांमध्ये मिळुन एकुण ५१ पाकिटांमध्ये मिळुन १०३ किलो ८३९ ग्रॅम वजनाचा ३१,१५,१७०/- रुपयांचा गांजा मिळुन आला. तसेच सदर गांजा वाहतुकीकरीता दोन वाहने कि. अं. १०,००,०००/- रु. असा एकूण ४१,१५,१७०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपीतांविरुद कलम ८(क), २०(ब)(II) (क) एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार पोलीस ठाणे रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे रामनगर करीत आहे.
कारवाई च्या यशस्वितेसाठी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे सोबत स.फौ. राजेंद्र खनके, रमेश तोकला, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, संजय आतकुलवार ना. पो. शि. सुभाष गोहोकार, सुरेंद्र महंतो, पो. शि. गणेश भोयर, मिलींद जांभुळे, गणेश मोहुर्ल, सतिश बगमारे, गोपीनाथ नरोटे, रविंद्र पंधरे,प्रांजल झिलपे, शेखर आसुटकर यांचा सहभाग होता.

रामनगर पोलिसांकडून योग्य तपासाची अपेक्षा !
स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासातच मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोठा गांजा शहरातील स्थानिक बंगाली काम परिसरात आरोपी व मुद्देमालासह ताब्यात घेतला सदर प्रकरण रामनगर पोलिसांकडे दर्द करून तपासासाठी दिले आहे. रामनगर पोलिसांनी सदर प्रकरणाचा योग्य तपास करून एवढ्या मोठ्या प्रमाणात येणारा हा गांजा कुठे नेण्यात येत होता याचा योग्य तपास करावा अशी अपेक्षा तारानगर पोलिसांकडून बळावली आहे.

Post a Comment

0 Comments