चौथा स्तंभ !!




लोकशाहिचा चौथा स्तंभ पत्रकार
धारदार लेखणीने करतो प्रहार
अन्यायाला चिरतो जणू तलवार
शब्दांचे जाळे विणतो मऊ-अलवार ॥१॥

सत्यासाठी संघर्ष करतो होवूनी तत्पर
धावुनी जातो आपात्कालात सत्वर
सदा खपत असतो रात्रंदिनी पत्रकार
तरी कौतूकाची थाप ही न भेटे पाठीवर ॥२॥

जीवाची पर्वा न करता पोहचवतो खबर
कानाकोपऱ्यातील इंतभूत बातमी बरोबर
सत्यता मांडण्याचा असतो प्रयत्न खरोखर
तरी आरोप-प्रत्यारोपात दम घुटतो परस्पर ॥३॥



कवयित्री: प्रा. रत्नमाला कोरडे- भोयर
माजी नगराध्यक्ष न.प.मूल
मूल, जि. चंद्रपुर

Post a Comment

0 Comments