न प च्या करावर लावण्यात आलेला २% दंड रद्द करण्याची भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांची नगराध्यक्षांकडे मागणी!



गडचांदूर : संपूर्ण देश्यात मागील दोन वर्षात कोरोनाने हाहाकार माचवला शासनाला शेवटी कोरोना आटोक्यात आणण्याकरिता सम्पूर्ण देश्यात लॉक डॉऊन लावावे लागले.त्यात शेतकरी, मजूर, लहान, मोठे व्यापारी सर्वांचे रोजगार ठप्प झाले होते. त्यात सर्वांचे आर्थिक परिस्थिती ढासळली .बरेच लोक कर्जबाजारी झाले.त्याच दरम्यान बरेच लोक नगर परिषदेचा मालमत्ता कर (टॅक्स) सुद्धा भरू शकले नाही.त्या दरम्यान अनेक सामाजिक संस्थांनी तसेच विविध पक्षांनी सर्वोतोपरी मदत केली.त्याच प्रमाणे नगर परिषद कडून किमान बीपीएल धारकांचे कर (टॅक्स) माफ करण्याची मागणी नगर परिषद चे विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांनी नगराध्यक्ष यांना पत्राद्वारे केली असल्याचे बोलले जात आहे,
त्या पत्राचा नगराध्यक्षांनी दखल घेतली तर नाही परन्तु त्या उलट सरसकट सर्वांना थकलेल्या मालमत्ता करावर प्रति माह २%, दंड वसूल करण्याचा निर्णय सभागृहात घेतला. हा पूर्णपणे चुकीचा असून लोकांना धडकी सोडणारा आहे.आताच कोरोनातून कसेबसे बाहेर पडत असून हा लावलेला २% दंड हा आर्थिक बजेट बिघडविणारा आहे.अशा या निर्णयामुळे आमजनतेत नगर परिषद विषयी असंतोष पसरला आहे. तेव्हा सदरचा दंड रद्द करण्याचा विषय तात्काळ सभेला घेऊन रद्द करण्याची मागणी भाजप पक्ष्याचे विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केली असून याकडे नगराध्यक्ष काय निर्णय घेतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments