दारूबंदी हटल्यानंतर जिल्ह्यात अवैध दारूची खुले आम विक्री !
- अबकारी विभागाची भुमिका संशयास्पद !
चंद्रपूर (वि.प्रति.) : मागील वर्षी जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आल्यानंतर ही अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सूरू असल्याचे चित्र आहे. दारूबंदी नंतर अवैध दारू व दारू विक्रेत्यांवर पोलिस विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत होती, पोलिसांवर यांचा भरमसाठ ताण होता. जिल्ह्यात त्यावेळी ही जिल्हा आबकारी विभागाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा केला जात होता. जिल्ह्यातील दारूबंदी हटल्यानंतर जिल्ह्यात सुरु असलेली अवैध दारू विक्री यांच्यावर कारवाई करण्यात आबकारी विभागाला आताही अपयशचं येत आहे. आबकारी विभागाची भूमिका जिल्ह्यात संशयास्पद आहे. दारूबंदी म्हटल्यानंतर जैसे थे या तत्त्वावर जिल्ह्यातील वाईन बार व बियर शॉपी चे परवाने नूतनीकरण करण्यात आले. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना डावलून काही परवाने नूतनीकरण करण्यात आले असल्याची ओरड आता होत आहे. आबकारी विभागात आलेल्या तक्रारी व माहिती अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारचे लक्ष दिले जात नाही किंवा कारवाई केली जात नाही हे तेवढेच सत्य आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व त्यावर निर्बंध याची जबाबदारी असलेला आबकारी विभाग मात्र मालसुताऊ अभियानामध्ये मस्त आहे. अवैध दारू विक्री नंतर आता एक्सपायरी डेट ची दारु विकल्या जात असल्याची बाब समोर आली आहे.
एक्सपायरी डेट च्या दारूची जिल्ह्यात सरेआम विक्री!दोन दिवसापूर्वी कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील मुख्य शिवाजी चौकात असलेल्या व्हाईसराय बियरबार या दुकानातून वैद्यता (एक्सापायरी) समाप्त झालेल्या बीयरची सर्रासपणे विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. सदर दुकानांमध्ये ग्रामपंचायत बीबीचे सदस्य मद्यप्राशन न करता गेले असता त्यांना 2021 डिसेंबर महिन्यापर्यंत वैद्यता असलेले बियर चे बॉटल देण्यात आले. मात्र मद्यप्राशन करीत असताना ही बाब लक्षात आल्यामुळे बियरबार चे पितळ उपडे पडले. वैधता समाप्त असलेली दारू सर्रासपणे विकल्या जात आहे, या बाबी ला घेऊन व्यवस्थापक यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झाली. सदर घटनेचा उपस्थितांनी व्हिडिओ मुद्धा तयार केला वैधता समाप्त झालेल्या बियर च्या बाटल्यांचे फोटो सुद्धा घटनास्थळी काढण्यात आले. जिल्ह्यातील दारूबंदी उठून जवळपास एक वर्षाचा कालावधी संपायला आलेला असून सदर बियर बार मध्ये एक्सपायर झालेली दारू आली कुठून याचा तपास आबकारी विभागाने अवश्य करायला हवा. मिळालेल्या माहितीनुसार ज्या बिअर बारमध्ये दारू मिळाली त्या बिअर बारचे मालक राजुरा येथील एक मोठी दारू व्यवसायिक असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात अवैध दारू विक्री सोबतच आता कशी काय मिळत आहे.
0 टिप्पण्या