*आजपासून गडचांदूरात कोंबडं बाजार जोरात? पोलिसांना आव्हान !



  • दोन तासातच न केला  बाजार बंद, चार नंतर पून्हा   होईल server सुरु !

  • "परवानगी मिळाली नाही, सत्राशे साठ पार्टनर आहे, सर्व्याले चिंधी-चिंधी भेटणार,! माहो नांव आलं तर तुम्ही आहोत न् मी आहे !"-कोंबडंबाजार वाल्याने स्वतः: दिली कबुली !

गडचांदुर : अवैध धंद्याचे मुख्य स्थान असलेल्या गडचांदूर शहरात आज शुक्रवार रंगपंचमीपासून मोठ्या स्तरावर कोंबड बाजार सुरू होणार असल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे. एक महिन्यासाठी स्थानिक स्तरावरून ही परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. गडचांदुरातील एक नगरसेवक यात भागीदार असून शहरातील एका बड्या नेत्याचा नातेवाईक म्हणून सांगणाऱ्या व पोलिसांच्या यादीत असलेल्या प्रतिष्ठीत (?) व्यक्तीने या कोंबडं बाजार चालविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे कळते. नुकतेच हाती आलेल्या वृत्तानुसार कोरपना रोडवरील बालाजी सेलिब्रेशनच्या बाजूला भरणा राहा कोंबड बाजार सकाळी साडेआठ वाजता सुरू झालं आणि बाराच्या दरम्यान याला बंद करण्यात आले अनेकश शोकीनानी या ठिकाणी गर्दी केली होती. जास्तीची रिस्क नको म्हणून कोंबडबाजार भरवण्यात भरविणाऱ्यांकडून हे पाऊल उचलले गेले आहे परंतु तुरंत दोन-तीन च्या दरम्यान हा कोंबडबाजार पुन्हा सुरू होईल असे सांगण्यात येते. गडचांदूरातील एक नगरसेवक आणि काही प्रतिष्ठित समजणाऱ्या व्यक्तीने हा कोंबडबाजार भरवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रायल बेसवर भरविण्यात आलेल्या कोंबड बाजारावर कोरवाई होते की सगळेच manage आहे.ज् हे बघणे महत्वाचे‌आहे.

परवानगी मिळाली नाही, सत्राशे साठ पार्टनर आहे, सर्व्याले चिंधी-चिंधी भेटणार,! माहो नांव आलं तर तुम्ही आहोत न् मी आहे ! काही महिन्यांनंतर कलकत्त्याला मोठे काम सुरु होणार आहे. फक्त एक दिवस चालविण्यासाठी ही परवानगी आहे. माझे नाव आले तर बघून घ्या. ! चोरी आणि सिनाजोरी म्हणतात ते यालाच ! आपण काही चुकीचे करत आहोत, हे या चोरांना कळतचं नाही.

रंगपंचमी पासून गडचांदुरमध्ये कोरपना रोडवर सूरू होणारा हा कोंबड बाजार जिल्हा पोलिसांना आव्हान देणारा आहे. स्थानिक गुन्हे शाखेने यावर अवश्य कारवाई करावी, अशी नागरिक मागणी करीत आहे.

Post a Comment

0 Comments