====================
माय मने पोट्ट्याले ह्या, झोंबलं काव भूत
आभाराकं पायत रायते, निरा मुट मुट
बरस तोंडात धरुन , मूलूक मूलूक हासते
दातदाळा सोडून शान, वठालेस घासते
वरन भात कसाका, लावरलीवर खाते
सिध्या सडकनय् , वाकडं वाकडं जाते
यका जागी ठेवत नाइ, कइस आपलं बूड
आन् उगलाल्या खराब, होते कवाय मूड
कालेजात जवानचं , लागलं हे जाहाले
तवानचं आवडते मने, एकटस राहाले
माले नसे समजत याले, झालं असन काय
असा वाटते आपटावा का, धरून याजे पाय
सांगा व्हइल कोन्या , हा उसेदीन बरा
पोरापाइ फुगल्या माह्या, डोसक्याच्या शिरा
====================
✍️ सुनील पोटे दिघोरी
====================
0 Comments