सिंदेवाही (चंद्रपूर) जवळ अवकाशातील पडलेल्या वस्तू सॅटेलाईट रॉकेटचे अवशेष !



  • स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे यांचा प्राथमिक अंदाज !
  • प्रशासन तंत्रज्ञाची चमू बोलावून त्या अवकाशीय वस्तूंची खात्री करावी आणि दोषी देश संस्थावर कारवाही करावी-मागणी

चंद्रपूर : काल दि. २/४/२०२२ रोजी संध्याकाळी ७.४५ वाजता आकाशात मोठ्या उल्का पडल्या असाव्या असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता परंतु त्या वस्तू उल्का नसून उपग्रहाचे किंवा राकेट चे तुकडे आहेत असा प्राथमिक अंदाज स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्ष पाहणीकरिता आज ३/४/२२ रोजी स्काय वाच ग्रुपची एक चमू गेली आणि २ अवकाशीय वस्तूची पाहणी केली असता त्यात काल पडलेली रिंग आणि आज आढळलेली गोल वस्तू या नुझीलंड च्या ब्लॅक स्काय उपग्रह सोडन्यासाठी वापरले जाणारे रॉकेट चे अवशेष आहेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला प्रशासन तंत्रज्ञाची चमू बोलावून त्या अवकाशीय वस्तूंची खात्री करावी आणि दोषी देश-संस्थावर कारवाही करावी अशी मागणी स्काय वाच ग्रुप तर्फे करीत आहोत..


काल महाराष्ट्रांतून अनेक लोकांनी रात्री ७.४५ वा अवकाशातून आगीचे गोळे पडताना पाहिले होते. बहुतेकांनी हयाला उल्कावर्षाव समजले होते. परंतु स्काय वाच ग्रुपतर्फे हे तुकडे उपग्रहाचे किंवा रॉकेट चे आहेत असा अंदाज व्यक्त केला होता. कारण कालच नुझीलंड देशाचे ब्लॅक स्काय नावाचा उपग्रह संध्याकाळी ६.१० ला सोडण्यात आला होता. ती वेळ आणि मार्ग पाहता हे त्याच रॉकेट चे तुकडे असावेत असा अंदाज आहे. चीनचे सुद्धा एक रॉकेट पडणार असल्याचे बोलले जात होते परंतु त्याची शक्यता वाटत नाही. या पडलेल्या अवकाशीय वस्तूंची पाहणी आणि खात्री करण्यासाठी ग्रुपचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे आणि सदस्य प्रा सचिन वझलवार आणि प्रा योगेश दुधपचारे सिंदेवाही येथे गेले आणि प्रत्यक्ष स्थळाची आणि वस्तूंची पाहणी केली असता तिये लाइबोरी हयां खेड्यात पडलेला रॉकेट चा बाह्य पत्रा आणि पवनपार जवळ एक गोल आकाराचा हायड्रोजन स्पिअर हा इंधन दाब नियंत्रण करणारी गोल सिलेंडर आढळली. अजूनही काही वस्तू परिसरात आढळण्याची शक्यता आहे. वरील आमच्या निरीक्षणावरून या अवकाशीय वस्तू उपग्रहाच्या रॉकेटचीच असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हि गोल रिंग १० बाय १० फुट व्यास ८ इंच रुंद आणि ४० किलोची आहे. तर दुसरी गोल वस्तू रॉकेटचाच एक भाग असून ती २ फुट व्यासाची आढळली, अजून काहि वस्तू परिसरात मिळण्याची शक्यता आहे. ग्रुप तर्फे लाडबोरी खेड्यातील लोकांशी चर्चा केली. तसेच पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासनाशी चर्चा करून इतर तुकडे शोधण्याची सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यासाठी योग्य ती कारवाही अशी विनंती केली.

तहसील आणि जिल्हा प्रशासन परिसरातील सर्व संभाव्य वस्तू गोळा करून सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवविणार असून पडलेल्या वस्तूंची पाहणी आणि ओळख करण्यासाठी तंत्रज्ञांची चमू बोलविणार आहे. आम्ही सुधा मिळालेल्या पुराव्या च्या आणि निरीक्षणाच्या आधारे शासन प्रशासन इस्रो आणि नुझीलंड च्या अवकाश संस्थेला याची माहिती देणार आहोत. अश्या रॉकेट पडल्याच्या घटना जगात क्वचित घडतात कारण बहुदा हे भाग समुद्रात पडावे किंवा निर्मनुष्य ठिकाणी पडावे

अश्या बेतानेच सोडले जातात परंतु तंत्रज्ञानाच्या आणि मानवी चुकीने क्वचित मानवी वस्तीत हे भाग पडतात. लाडबोरी या लहानश्या गावात अगदी सभोवताली घरे असताना अगदी त्यांच्या मधोमध हि ५० किलो वजनाची तप्त रिंग पडली आणि फार मोठा अनर्थ ( प्राणहानी आणि वितहानी) घडता घडता वाचला. अन्यथा तेथील घरे जळून प्राणहानी झाली असती. या घटनेची प्रशासनाने चौकशी करून समंधित देश आणि अवकाश संस्थेवर दंडात्मक कारवाही करावी अशी मागणी आम्ही स्काय वाच ग्रुप च्या वतीने करीत आहोत.

Post a Comment

0 Comments