गडचांदूर मध्ये देशी दारू दुकानात समोरील झिंगाट!


तक्रार नाही म्हणून एफआयआर दाखल झालीच नाही!

दारू विक्रेत्यांच्या गुंडानी चालविलेल्या या गुंडागर्दी वर अंकुश आणणार तरी कोण ?


चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील शेंद्रे यांच्या देशी दारू दुकानात शुक्रवार दिनांक 6 मे रोजी दारू पिण्यास गेलेल्या एका ग्राहकाने दारूची दर जास्त आहे अशी तक्रार केली असता दारू दुकान दुकानातील नोकरांनी हात-पाय बांधून भर रस्त्यावर अमानुष रित्या मारहाण केली. सोशल माध्यमांवर सदर घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्र मोठ्या प्रमाणात वायरल झाले. यासंदर्भात काल साप्ताहिक विदर्भ आठवणी न्युज पोर्टल सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी व्हिडिओ सहित जिल्ह्यात होत असलेल्या गुंडागर्दी च्या विरोधात वृत्ताच्या माध्यमातून आवाज उचलला. या गुंडगिरीला 48 तासाचा अवधी लोटल्यानंतर सुद्धा कोणत्याच प्रकारची एफ.आय.आर. दाखल करण्यात आली नसल्याचे कळते. महत्त्वाचे म्हणजे अमानुषरित्या मार खाणारी व्यक्ती ही मानिक गेट समोरील एका हॉटेलात कार्यरत होती. एखाद्या मजूराला अशा पद्धतीचा अमानुषरित्या गुंडगिरी करीत मारहाण होत असेल तर तो व्यक्ती तक्रार करण्याच्या मानसिकतेत खरंच राहू शकतो कां? ही विचार करण्याची बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेंद्रे यांच्या देशी दारू दुकानात व्यवस्थापक म्हणून गोपी नावाचे एक व्यक्ती कार्यरत आहेत.  गणेश या ग्राहकाला मारहाण करणारा कृष्णा नावाचा व्यक्ती हा व्यवस्थापक गोपी यांच्या साळा आहे, असे सांगितल्या जाते.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नंतर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विकल्या जात असून अपराधी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी अवैध दारू विक्री मध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असे कारण समोर करण्यात येऊन जिल्ह्यात कमी दराने दारू शौकिनांना दारू उपलब्ध होईल आणि त्याच्या महसूलही शासनाच्या तिजोरीत जमा होईल या कारणाने जिल्ह्यात दारू सुरू करण्यात आली परंतु आता परवानाधारक दारु दुकानासमोरच जर अशा प्रकारचे अमानुषपणे गुन्हेगारीचे प्रकरण होत असेल तर त्यावर त्वरित आळा बसविणे गरजेचे आहे. जिल्ह्यात दारूबंदी हटविल्यानंतर नंतर ही मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे वृत्त ऐकायला आणि वाचायला मिळते या अवैध दारू विक्री च्या पाठीमागे असणाऱ्यांच्या आता तरी शोध घेणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेंद्रे यांच्या परवानाधारक दुकानातूनही शेजारच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दारू चा अवैध पुरवठा केला जात आहे कां ? याचा शोध शेजारीच असलेल्या पोलीस विभागाने अवश्य घ्यावा व घडलेल्या घटनेच्या तपास करून परवानाधारक व ग्राहकाला विनाकारण अमानुषपणे मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या अशा व्यक्तींना धडा अवश्य शिकवायला हवा.

यासंदर्भात संबंधित विभागला पत्रकार संघाच्या माध्यमातून निवेदन देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments