चंद्रपुर जिल्हा हा खनिजे, धातू आणि जिवाश्म ह्यामुळे समृध्द आहे. अलीकडे येथे सोने, तांबे आणि मौल्यवान धातू आढळली आहेत, ह्यातच आता फुलगुराईट हे विजाष्म आढळले आहेत. अशी माहिती येथिल पर्यावरण आणि भुशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे. Chandrapur district is rich in minerals, metals and fossils. Recently, gold, copper and precious metals have been found here, now fulgurite has been found. Suresh Chopane has given.
पावसाळ्यात सगळीकडे विजा पडतात, त्यामुळे अनेकदा वन्यजीव आणि मानव ह्यांचा मृत्यू होतो परंतु वीज पडून फुल्गुराईट (Fulgurite) नावाचा मौल्यवान खडक तयार होतो हे फारसे कुणाला माहिती नाही. सर्वच ठिकाणी हा विजाश्म खडक (Fossilized Lightning) तयार होत नसून जिथे रेती / वाळू असेल तिथेच हा तयार होतो. नदी नाल्यात वीज पडल्यास तो जमिमिनिच्या आंत तयार होत असल्याने कुणाला फारसा दिसत नाही. अनेक वर्षानंतर तो दिसला तरी कुणाला हा मौल्यवान खडक ओळखता येत नाही. वर्धा नदीच्या किनारी असे अनेक खडक आढळले आहेत .
विजाश्म (fossilized lightning) किंवा विजेचा खडक म्हणून ओळखले जाणारा हा खडक वीज पडून तयार होतो.विजेमध्ये १०० मिल्लीयन व्होल्ट आणि २५००० डिग्री तापमान असते ज्यामुळे जमिनीतील सर्व खनिजे वितळून काच किंवा नवीन अश्म आकार घेतात.ज्या जमिनीत वाळू ,खनिज किंवा वाळू मिश्रित चुनखडक असतो त्याठिकाणी खूप चांगला विजाश्म तयार होतो.विजेच्या प्रचंड उष्णतेमुळे जमिनीतील खडकावर वृक्षाकार आकार आणि जमिनीतील वाळूच्या गोल , पोकळ किंवा घट्ट लांबीच्या नळी च्या आकारांचे खडक तयार होतात. जगात आतापर्यंत आढळलेले विजाश्म हे १६ फुट लांब आंनी एक फुट जाडीचे फुल्गुराईट आढळले आहे. वाळू आणि वाळवंट क्षेत्रात खूप चांगल्या आकारांचे खडक तयार होतात.आपल्याकडे नदीचे,नाल्याचे पात्र,नदीचे तीर इथे असे विजाश्म सापडू शकतात. परंतु हे खडक जमिनीत वरपासून खाली ५० फुट खोल पर्यंत तयार होतात त्यामुळे लवकर सापडणे कठीण असते. विजाश्मांचे ५ प्रकार आढळतात त्यात वाळू ,माती ,चुनखडक,खडक आणि काच ह्यासारखे फुल्गुराईट आढळतात.एखाद्या क्षेत्रात कितीदा विजा पडल्या हे ह्या खडकावरून सांगता येते.
फुल्गुराईट चे महत्व-
वैज्ञानिक दृष्ट्या विजाश्मांचे महत्व नक्की आहे,विजाश्मामुळे प्राचीन काळातील हवामान कसे होते ते कळते , ह्यातून नवीन खनिजे आणि विविध आकाराचे मोल्यवान खनिजे मिळतात.जगातील अनेक देशात फुल्गुराईट गोळा केल्या जाते आणि महागड्या किमतीने विकल्या जाते.विजेच्या प्रचंड शक्तीतून तयार झालेल्या ह्या खडकात प्रचंड ऊर्जा आणि शक्ती असून ह्या खडकात चमत्कारिक शक्ती असते असे मानले जाते . विजाश्मामुळे मुळे शारीरिक आणि मानसिक रोग दूर होतात असे मानले जाते म्हणून त्याची पूजा करून हा खडक आणि ध्यानासाठी वापरला जातो .एवढेच नव्हे तर विदेशात खूप जास्त किंमत मोजून त्यांना खरेदी केल्या जाते. एक लहानसा तुकडा परदेशात १५ डॉलर ला तर चांगले खडक १०० डॉलर ला विकल्या जातो. वैज्ञानिक दृष्ट्या ह्या खडकात चमत्कारिक शक्ती नसल्या तरी खूप लोकांची ती मान्यता आहे.
वाळवंटात अतिशय चांगले फुल्गुराईट मिळते परंतु थोडा भूशास्त्राचा अभ्यास केला आणि खडकांचे प्रकार ओळखता आले तर आपल्या ग्रामीण भागातील नदी-नाल्यात सुद्धा असे खडक मिळू शकतात. विध्यार्थ्यांनि,भूगोल शिक्षकांनी अश्या प्रकारची खडक शोधावी किंवा इतरही खडक गोळा करावी, त्यातून त्यांच्या भौगोलिक ज्ञानात भर पडेल आनि त्यातून वैज्ञानिक जाणीवा तयार होतील, संशोधक तयार होतील, असे मत पर्यावरण आणि भुशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे (98223 64473) यांनी व्यक्त केले आहे.
0 Comments