माजी नगरसेवक बलराम डोडानी यांची मागणी
लोकप्रतिनिधींच्या पत्राकडे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे (रूग्णालय) चे दुर्लक्ष !
चंद्रपूर (का. प्र.) : शहरातील वर्दळीच्या गांधी मार्गावर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय (रूग्णालय) आहे. मात्र या मार्गावर दररोज वाहनांची वर्दळ आणि रूग्णवाहिकांची ये-जा यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या मुख्य मार्गावरून सर्व रॅली निघतात. त्यामुळे रूग्णालयात पोहोचणाऱ्या रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यासह रूग्णालयात येणाऱ्या गंजवार्ड सिग्नल मार्गे रूग्णालयात पोहोचावे लागते. यात बराच वेळ वाया जातो. नागरिक व रूग्णांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (रूग्णालय) मागील गेटपासून रूग्णांसाठी व रूग्णवाहिका सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक बलराम डोडानी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळु धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार यांच्या देण्यात आले. त्यांच्या मागणीवरून पालकमंत्री मुनगंटीवार, खासदार धानोरकर व आमदार जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन ला पत्र पाठवुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. जटपुरा गेटकडून येणाऱ्या रूग्णवाहिकेला गंजवार्ड चौक, जयंत टॉकीज चौक मार्गे हॉस्पिटल गाठावे लागते, असे असतांना ही या चौकांमध्ये रहदारीचे सिग्नल्स असल्याने नेहमीच वाहतुकीची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत ही कामे करावी लागतात. त्यामुळे रूग्णांना मोठ्या त्रासातुन जावे लागत असून वाहतुक कोंडीमुळे रूग्णवाहिकेला रूग्णालयात पोहोचणे अवघड झाले आहे. जिल्हा रूग्णालयामागील कस्तुरबा मार्गाचे गेट पुर्वी सूरू करण्यात आले होते.
मेडिकल कॉलेजमध्ये जाणाऱ्या रूग्णवाहिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे या रूग्णालयाच्या मागील भागातील आपातकालीन दरवाजा पुर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. डोडानी यांच्या मागणीनंतर लोकप्रतिनिधींना सदर मागणीचे पत्र दिल्यानंतर हा आपातकालीन दरवाजा पुर्ववत सुरू करण्यात यावा, असे पत्र चंद्रपूर मेडिकल कॉलेज चे डिन यांना लोकप्रतिनिधींना देण्यात येऊनही या पत्रांची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. तरी त्वरित सदर मागणीकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक बलराम डोडानी यांनी केली आहे.
0 टिप्पण्या