Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

७ ला नागपूर येथे न्यूज पोर्टल आणि त्याविषयीचे कायदे कार्यशाळा ! News Portal and Law Workshop at Nagpur!नागपूर (प्रतिनिधी) : डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने दिनांक : शनिवार, 7 जानेवारी 2023 रोजी नागपुरात प्रथमच डिजिटल मीडिया साठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत चालणारी ही कार्यशाळा वनामती, भोळे ‍पेट्रोल पंपजवळ होणार आहे.

या कार्यशाळेमध्ये डिजिटल मीडिया आणि न्यूज पोर्टल संदर्भातील केंद्राने केलेल्या कायद्यासंदर्भात सविस्तर माहिती न्यूज पोर्टल नोंदणीची प्रक्रिया, डिजिटल मीडियातील नव्या संधी आणि फेक न्युज रोखण्यासाठी उपाय यावर माहिती देण्यात येणार आहे. कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी कायद्यातील विविध तज्ञ, डिजिटल मीडियातील तज्ञ आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. टेक्नोव्हिजन मीडिया अँड कम्युनिकेशन, नागपूर सहकार्याने आयोजित या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी 8208737769 वर संपर्क साधावा. 

Post a Comment

0 Comments