नववर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक...!
चंद्रपूर (प्रति.) : हिवाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोव्हेंबर,डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या आकडेवारी त स्पष्ट होते. जानेवारी महिन्याच्या एकूण 31 दिवसात 31 दिवस प्रदूषण आढळले त्यात 02 दिवस समाधानकारक प्रदूषण,14 दिवस साधारण प्रदूषण,13 दिवस जास्त प्रदूषण तर 02 दिवस धोकादायक प्रदूषण आढळले .समाधानाची बाब म्हणजे दोन दिवस समाधान कारक प्रदूषनाचे आढळले .
गेल्या 2 वर्षापासून चंद्रपुरच्या प्रदूषनात सातत्याने वाढ होत आहे, त्यात औद्योगिक आणि शहरी प्रदूषणाचा वाटा आहे.ह्यामुळे आरोग्यदायी समजल्या जाणाऱ्या हिवाळ्यात प्रदूषण वाढ ही आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.चंद्रपुर मध्ये सर्व दवाखान्यात श्वसनाचे रोग,त्वचा,डोळे, ऐलर्जी आणि इतर रोगाची वाढ झाल्याचे डॉक्टर सांगतात.दुर्दैवाने हे सिध्द करण्यासाठी शासन मात्र आरोग्य सर्व्ह घेत नाही.केवळ अपवाद म्हणून 2005 साली सर्वे झाला होता ,तेंव्हा सुध्दा जिल्ह्यात जास्त प्रदूषण आढळले होते.
AQI-
0-50 चांगला
51-100 साधारण प्रदूशीत
101-200 प्रदूषित
201-300 अति प्रदूषित
301-400 धोकादायक
आरोग्यावर काय परिणाम!
1) 0 ते 50 AQI (Air quality index) हा आरोग्यासाठी चांगला
2) 51 ते 100 हा आधीच श्वसनाचे रोग्यासाठी त्रासदायक
3) 101 ते 200 दमा,श्वसनाचे रोग आणि हृदय रोग्यासाठी धोकादायक
4)201 ते 300 सर्व नागरिकासाठी धोकादायक असते, अशी माहिती ग्रिन प्लानेट सोसायटी,चंद्रपुर चे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.
0 Comments