गडचांदूरात संत सेवालाल जयंती साजरी ! # Saint Sewalal Jayanti celebration in Gadchandur!



श्री संत सेवालाल महाराज यांचे मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न कर- समाजसेवक हितेश चव्हाण

गडचांदूर : गडचांदूर येथे संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संत सेवालाल महाराज हे संपूर्ण भारतातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहे. संत सेवालाल महाराज हे निसर्ग पूजक आहेत. बंजारा समाजाच्या रूढी परंपरेनुसार भोगविधी पूजा करून शिरा प्रसाद वाटप करून सदर कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. त्यांनी बंजारा समाजाला सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला आहे असे विचार श्री पांडुरंग जाधव संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी आपले विचार मांडले. सदर जयंती कार्यक्रमात समाजसेवक हितेश चव्हाण यांनी बंजारा समाज एक संघ कसा राहील? यावर आपले विचार व्यक्त केले. बंजारा समाजातील लोकांनी आपले कुलदैवत श्री संत सेवालाल महाराज यांचे मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करू असे विचार हितेश चव्हाण यांनी मांडले. सदर कार्यक्रमांमध्ये नुकत्याच शिक्षक पतसंस्थेमध्ये निवडून आलेल्या बंडू राठोड गुरुजी, विष्णू जाधव सर राजश्री राठोड  या संचालक लोकांचा पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर जयंती उत्सव कार्यक्रमात श्री विनोद चव्हाण सर यांनी अकरा हजार रुपये नगदी देऊन मंदिर निर्मितीसाठी मदत केली.  सदर उत्सव जयंती कार्यक्रमात श्री गोविंद पवार सर यांनी बंजारा समाज रूढी परंपरा चालेरीती यावर दीर्घ प्रकाश टाकला आणि आपले विचार प्रकट केले सदर जयंती कार्यक्रमात बंजारा समाजाची विद्यार्थिनी डॉक्टर निकिता कनीराम चव्हाण यांनी बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून आपण शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी असे विचार मांडले सदर जयंती उत्सव कार्यक्रमांमध्ये डॉक्टर आशिष मधव पवार यांनी आपल्या भाषणातून संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, डॉक्टर तुषार नामदेव जाधव यांनी मी कसा घडलो आणि समाजाच्या मुलांनी कसा अभ्यास करायला पाहिजे यावर आपले विचार प्रकट केले या कार्यक्रमाचे संचालन श्री उमेश आडे सर आणि श्री हरीश आडे सर यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव पवार सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री विनायक राठोड सर यांनी केले सदर कार्यक्रमाला बंजारा समाजातील श्री गणेश पवार, इंजिनीयर राठोड साहेब जिल्हा परिषद चंद्रपूर इंजिनीयर अविनाश चव्हाण , एमडी चव्हाण उच्च श्रेणी मुख्याध्यापक, कनीराम पवार उच्च श्रेणी मुख्याध्यापक , अण्णाराव आडे केंद्रप्रमुख, बंडू राठोड सर, मधुकरजी राठोड व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  , पांडुरंग पवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक, राम पवार, विनोद चव्हाण, नामदेव जाधव, उत्तम पवार, गुलाब राठोड, शंकर राठोड , बालाजी पवार, सोपान जाधव बाबू सिंग पवार मातोश्री संस्था पिटीगुडा , अंबादास पवार पोलीस, इंदल राठोड पोलीस, विष्णू चव्हाण, उमेश चव्हाण, अंकुश पवार, सुनील चव्हाण, संदेश  पवार, जीवन आडे, बंजारा समाजातील सर्व समाज बांधव सदर कार्यक्रमाला महिला व मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

Post a Comment

0 Comments