Editor- Raju Bitturwar - 7756948172 | athwadividrbha@gmail.com

सावधान.....! अनुचित प्रकारांवर 'पोलिस' दादाचा राहणार 'डोळा' ! Beware.....! 'Police' Dada's 'eye' on inappropriate forms!

" बुरा ना मानो, होली है... "'!!

चंद्रपूर (वि. प्रति . ) : सोमवार दि. ६ रोजी होळी व ७ रोजी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त करण्यात आला असुन अनुचित प्रकारांवर 'पोलिस' दादाचा 'डोळा' राहणार आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबतचं सहा उपविभागीय पोलिस अधकारी, २६ पोलिस निरीक्षक, १०० पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, १००० पोलिस कर्मचारी, ७०० होमगार्ड आणि सुमारे १०० वाहतुक पोलिस बंदोबस्तासाठी राहणार असुन याशिवाय दोन एसआरपीएफ चमु आणि १० वेगवेगळी पथके अनुचित प्रकार टाळण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. ड्रंक अॅन्ड ड्राईव्हअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस विभागाने आपल्या प्रेस नोट मध्ये दिली आहे.  "बुरा ना मानो, होली है...." ! असे मात्र आपल्याला पोलिस दादाला म्हणता येणार नाही म्हणून  “सावधानी” बाळगण्याची गरज आहे.

होळी आणि धुलीवंदन साजरा करण्यासाठी अनेकजण टोळक्यांनी फिरत असतात, त्यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या बाबीचा गैरफायदा उचलित अनेक गैरप्रकार होत असतात. महिलांची छेडछाड, अंगावर रंग टाकणे, विनयभंग, रंगाने भरलेले फुगे फेकणे, नाचतांना अंगविक्षेप करणे सारखे गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून यासाठी विशेष दक्षता घेत पोलिसांचे पथक नेमणुक केले आहे. नागरिकांनी इच्छेविरूद्ध रंग टाकु नये, शिवीगाळ करू नये, जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे, निर्धारित मर्यादेतचं वाद्य वाजविणे यासारख्या गैरकृत्यांना टाळण्याचे आवाहन पोलिस विभागाने केले आहे. धुलिवंदनाला मटन मार्केट मध्ये मटन खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते, त्यावेळी मद्यप्राशन करून येणाऱ्यांवर सुद्धा ड्रंक व ड्राईव्ह अंतर्गत गुन्हे दाखल होवू शकतात. रेकॉर्डवरील गुन्हेगारांसाठी कोंबिंग ऑपरेशन राबविले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ड्रंक अॅन्ड ड्राईव्हवर पोलिसांचे विशेष लक्ष ! (Special attention of the police on drunk and drive!)

ड्रंक अॅन्ड ड्राईव्हवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार असुन मागील दोन महिन्यात पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ८९१ वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन यामुळे अपघातांच्या संख्येमध्ये कमालीची घट झाली असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. मागील वर्षी ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह मध्ये पुर्ण वर्षभरात १२७१ चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी ३७, फेब्रुवारी १८, मार्च ३६, एप्रिल १५, मे ११०, जुन ३०७, जुलै १८५, ऑगस्ट ११२, सप्टेंबर ४६, ऑक्टोंबर १२, नोव्हेंबर मध्ये १८ तर डिसेंबर महिन्यात सगळ्यात जास्त म्हणजे ३७५ वाहन चालकांवर ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली. तर मागील फक्त दोन महिन्यात ८९१ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. याच कारणाने होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मद्य प्राशन करून वाहन चालविणे, ओव्हर स्पिड, स्टंटबाजी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे पोलिसांचा भर आहे.

Post a Comment

0 Comments