क्रिकेट सट्टेबाजांवर एलसीबी च्या कारवाया ! #Actions of LCB on cricket bookies!



पडोली, रय्यतवारी कॉलरी व भद्रावती येथील सटोरियांना केले गजाआड!

चंद्रपुर (वि.प्र.) सध्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट वर मोठया प्रमाणात सट्टा लावण्यात येत असून या सटोरियांवर एलसीबी च्या विशेष पथकाची करडी नजर असून काल चंद्रपूरातील तुकूम येथील कारवाईनंतर आता पडोली, रय्यतवारी कॉलरी व भद्रावती येथे गुप्त माहिती च्या आधारे एलसीबी पथकाने सटोरियांना गजाआड केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबवुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी-कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून राबविण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, पो.स्टे पडोली हद्दीतील यशवंतनगर येथे MH-34 पानठेला येथे येथे जुगल हिरालाल लोया हा इंडियन प्रिमीयर लीग (IPL-2023) सनराईज हैद्राबाद विरुद्ध लखनौ सुपर जायटस क्रिकेट या IPL क्रिकेटच्या मँचवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अश्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम मोबाईलवर संभाषण व मेसेज करून व कागदावर आकडे लिहून IPL क्रिकेट सट्टा चालवितांना मिळुन आले. त्याला ताब्यात घेवुन त्यांचेकडुन मोबाईल, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण १२,०१० /- रू. चा माल जप्त करण्यात आला असून सटटेबाज जुगल हिरालाल लोया (४८) रा. यशवंत नगर, हनुमान मंदिरजवळ, पडोली, जि चंद्रपुर तर पाहिजे असलेला आरोपी नामे पारस उड़ाक रा. चंद्रपुर यांचेविरूध पो.स्टे पडोली येथे अप.क्र. ७०/२०२३ कलम १२ (अ) म.जु.का, सहकलम १०९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो स्टे पडोली करित आहे.

तसेच पो.स्टे रामनगर हद्दीतील रयतवारी कॉलरी चंद्रपुर येथील सि. आर. सि ग्राउन्डचे गेटसमोर येथे सिध्दार्थ राजकुमार कुरमी हा इंडियन प्रिमीयर लीग (IPL-2023) सनराईज हैद्राबाद विरुध्द लखनौ सुपर जायटस क्रिकेट या IPL क्रिकेटच्या मॅचवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला असता सदर ठिकाणी हा इसम मोबाईलवर संभाषण व मेसेज करून व कागदावर आकडे लिहून IPL क्रिकेट सटटा चालवीतांना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन मोबाईल, नगदी रक्कम, जुगाराचे ईंतर साहीत्य असा एकुण १७,८१० /- रू. चा माल जप्त करण्यात आला असून सटटेबाज सिध्दार्थ राजकुमार कुरमी (२५) रा. रयतवारी कॉलरी, बि.एम.टि. चौक, चंद्रपुर यांचे विरूध पो. स्टे रामनगर येथे अप. क्र. ३४९/२०२३ कलम १२ (अ) म.जु. का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो स्टे रामनगर करित आहे. तसेच पो.स्टे भद्रावती हद्दीतील एकता नगर चारगाव येथील मंगेश दुरुडकर हा इंडियन प्रिमीयर लीग (IPL-2023) सनराईज हैद्राबाद विरुध्द लखनी सुपर जायटस क्रिकेट या IPL क्रिकेटच्या मॅचवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अशी खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाल्यावरून वरीष्ठांचे आदेशान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी सदर इसम मोबाईलवर संभाषण व मेसेज करून, लॅपटॉप व नोंदवही वर आकडे लिहुन IPL क्रिकेट सटटा चालवीतांना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन ४ मोबाईल, लॅपटॉप नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण ६३,५५०/- रू. चा माल जप्त करण्यात आला असून सटटेबाज नामें मंगेश अरुन दुरुडकर, वय ३२ वर्ष रा. एकता नगर वेकोली वसाहत भद्रावती जि.चंद्रपुर यांचे विरूदध पो.स्टे भद्रावती येथे अप.क्र. १५८ / २०२३ कलम ४,५ म. जु. का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो.स्टे भद्रावती करित आहे.
पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर सपोनी मंगेश भोयर, पो उप नि. अतुल कावळे, पो. हवा. संजय आतकुलवार, स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, नापोकॉ संतोष येलपुलवार, गजानन नागरे, पोकॉ नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, कुंदन बावरी, रविंद्र पंधरे, अजय बागेसर, संदीप मुळे, प्रशांत नागोसे, चालक नापोशी चंद्रशेखर आसुटकर यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखा आक्रमक पण मुख्य सटोरिये मात्र अटकेपासून लांब !

मागील दोन दिवसापासून आयपीएल क्रिकेटवर सटोरियांवर एलसीबी ने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एलसीबी आक्रमक झाली असून अद्यापही मुख्य सटोरीये अटकेपासून लांब असल्यामुळे छोट्या-छोट्या मास्यांना जाळ्यात घेऊन क्रिकेट सटोरियांचे मोठे जाळे पोलिस उध्वस्त करू शकतील काय? हे पाहणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या