स्थानिक गुन्हे शाखेने एकाला केली अटक तर एक फरार ! Local crime branch arrested one and one absconding!




आयपीएल क्रिकेट सट्टेबाजांवर कारवाई !

चंद्रपूर (वि.प्र.)
आयपीएल क्रिकेट सामन्यांमध्ये सट्ट्याचा बोलबाला असतो. चंद्रपूरातही आयपीएल वर सट्टा घेणाऱ्यांचे रॅकेट सक्रीय आहे. या सट्टेबाजावर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेने एलसीबी चे पो.नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पथक बनविले असून या पथकाने
शिवाजीनगर, राधाकृष्ण शाळेचे मागे, तुकुम चंद्रपुर येथील देविदास पडगीलवार हा इंडियन प्रिमीयर लीग २०२३ ( IPL 2023) के के. आर. विरूद्ध आर.सि.बि. या क्रिकेटच्या मॅचवर पैशाची बाजी लावुन हार-जीतचा जुगार खेळत असल्याच्या माहितीवरून वरिष्ठांच्या आदेशावरून छापा टाकला असता  सदर ठिकाणी एक इसम लाईव्ह मॅचवर टीव्ही, मोबाईलवर IPL क्रिकेट सटटा चालवितांना मिळुन आला. त्याला ताब्यात घेवुन त्यांचेकडुन मोबाईल, टीव्ही, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण ३०,०१० /- रू. चा माल जप्त करण्यात आला असुन देविदास दिलीप पडगीलवार (३२) रा. दे.गो. तुकुम, शिवाजी नगर, राधाकृष्ण शाळेचे मागे, चंद्रपुर याला अटक करण्यात आली असून माडबन, चंद्रपूर येथील अविनाश हांडे (३७)  यांचा तपास पोलीस घेत आहेत. आरोपींविरूदध पो.स्टे. रामनगर येथे अप.क्र. ३४८ / २०२३ कलम ४५ मु. जु.का., सहकलम १०९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पो.उप.नि. अतुल कावळे, पो. हवा. संजय आतकुलवार, नापोका संतोष येलपुलवार, पोका नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, कुंदन बावरी, रविंद्र पंधरे यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे.

आयपीएल वर सट्टा चालविणाऱ्यांचे रॅकेट जिल्ह्यात मोठ्या स्तरावर कार्यरत असून करोडो रूपयांची उलाढाल या व्यवसातून होत असते. मागील वर्षी गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी पोलिसांनी क्रीकेट सटोरियांवर अहेरीचे एसडीपीओ यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून हे रॅकेट उधळण्यासाठी मोहीम राबविली होती. त्यावेळी या टोळीची पाळेमुळे चंद्रपूरात असल्याचे आष्टी तपास पथकाला मिळाली व आष्टी पोलिसांनी चंद्रपूर येथील म्होरक्यांवर कारवाई करून या रॅकेट ला तहस-नहस करण्यात यश मिळविले होते. त्यावेळी चंद्रपूरात सूरू असलेल्या या सट्टेबाजांची साधी माहितीही चंद्रपूर पोलिसांना कशी लागली नाही यावरून चंद्रपूर पोलिसांची नाचक्की झाली होती. आत्ताही तेच मोहरे या व्यवसायात सक्रीय तर नाही नां?  मुख्य म्होरक्याला पोलिसांनी लवकरात लवकर बेड्या ठोकून या व्यवसायाला चंद्रपूरातून हद्दपार करावे, अशी अपेक्षा नागरिक करित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या