दुःखात, शोषितांचा आधार भीम आहे
लढण्यात हिंमतीचा ललकार भीम आहे
अज्ञान बांधलेला येथे पिढ्यापिढ्यांना
शिकवून ज्ञान देता साकार भीम आहे
देऊन लोकशाही देशात एकतेची
अर्थात! संविधानी सरकार भीम आहे
जाती तहानलेल्या कित्येक तृप्त झाल्या
सत्यात आग्रहाचा चवदार भीम आहे
संघर्ष जीवनाचा होता क्षणाक्षणाला
जगलो म्हणून माझा हकदार भीम आहे
विसरू नकोस येथे, किंमत तुझ्या मताची
एकेक त्या मताचा एल्गार भीम आहे
गातो गझल सुखाची वाचून भीमराया
हे श्रेय मानतो मी, साभार भीम आहे
ललित बोरकर, चंद्रपूर - ४४२४०१
बाळ भीमराव
चवदा एप्रिल । बाळ जन्मा आले।
नाव ते ठेविले । भीमराव।।
जन्मगाव महू । आई भीमाबाई।
पत्नी रमाबाई । कुटुंबात।।
कठीण तो काळ । जीवन संघर्ष।
शिक्षणची सार्थ । घडविले।।
शिक्षण ते घ्यावे । संघटीत व्हावे।
संघर्ष करावे । नारा त्यांचा ।।
स्पृश्य-अस्पृश्यता । अंधश्रद्धा भारी ।
दूर होई सारी । शिक्षणाने ।।
न्याय हक्कासाठी । लढा ज्यांनी दिला
संघर्षही केला ।भीमराव ।।
जयंती भिमाची। साजरी करु या ।।।
अंगी बाणवू या । विचारांना ।।
कवी - उपेंन्द्र रोहनकर, गडचिरोली.
0 टिप्पण्या