महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा, जिल्हा चंद्रपूर ने दिले तहसिलदार, मार्फत मंत्र्यांना निवेदन !
गुरुवार, दि. २०/०४/२०२३ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गंगाधरराव गण्यारपवार यांना चामोर्शी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सकाळी ५.०० वाजता फोन करुन ठाण्यात येण्यास सांगितले. अतुल गंगाधरराव गण्यारपवार सहजपणे एकटेच पोलीस ठाण्यात गेले. पोलीस निरीक्षकांनी त्यांना उलटसुलट प्रश्नांची उत्तरे विचारून अतुल गण्यारपवार यांना अमाणूष मारहाण केली. अतुल गण्यारपवार यांचा कोणताही गुन्हा नसतांना त्यांचे सोबत असे वागणे हे अत्यंत अन्यायकारक व घटनेच्या विरोधात असून मानवी मुल्याची पायमल्ली करणारा प्रकार आहे. सामान्य माणसाला पोलीस विभागाचे सरक्षण मिळावास पाहीजे त्यांची दहशत निर्माण झाल्यास सामान्य माणूस न्याय मागण्यास पुढे येणार नाही आणि यामुळेच समाजात चोर, बदमाश, गुंडे यांची समांतर सत्ता तयार होते.
सदर प्रकरणी योग्य चौकशी करुन ज्यांचा गुन्हा असेल त्यांचेवर त्वरीत व उचित कार्यवाही करण्यात यावी. सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही. या संबधित प्रशासनाने अजुनही कोणतीही कार्यवाही केली नाही. पोलीस निरीक्षक श्री राजेश खांडवे हे दोषी आढळल्यास त्यांना त्वरीत निलंबीत करण्यात यावे, संबंधितांवर कोणतीही कार्यवाही न झाल्यास न्याय मागण्याकरीता माहाराष्ट्र आर्य वैश्य महासभेद्वारा आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मा. गृहमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा, मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर याना देण्यात आले आहे.
यावेळी जयंत बोनगिरवर, डॉ. अनिल माडूरवार, राजेश्वर चिंतावार, डॉ. विजय आईंचवार, शंकर गंगशेट्टीवार, गुणवंत गोगुलवार, अनंत भास्करवार, संतोष चिल्लरवार, सह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments