शनिवारी स्मार्ट ग्राम बिबी येथे गझल मुशायरा! Ghazal Mushaira at Smart Gram Bibi on Saturday!




महाराष्ट्रातील १२ नामवंत गजलकारांची रंगणार जुगलबंदी

कोरपना (प्रति.): जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबी येथे शनिवार दि. २२ ला ब्रह्मकमळ साहित्य समूह, मुंबई प्रस्तुत मराठी गझल मुशायरा आयोजित केला असून महाराष्ट्रातील १२ नामवंत गजलकारांची जुगलबंदी रंगणार आहे.अक्षय तृतीया आणि रमज़ान ईदच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून गझल मुशायरामध्ये नितीन देशमुख (अमरावती), अनंत नांदुरकर (नागपूर), वैभव कुलकर्णी (पंढरपूर), मारोती मानेमोड (नांदेड), जयदीप विघ्ने (बुलढाणा), आनंद पेंढारकर (डोंबिवली), राजेश देवाळकर (बल्लारपूर), सुरेश शेंडे (गडचिरोली), अविनाश येलकर (अकोला), विशाल राजगुरू (सोलापूर), राम रोगे (नांदा) आदींची उपस्थिती लाभणार आहे. 
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी टेकाम उपस्थित राहतील. उद्घाटक अल्ट्राटेक सिमेंट आवारपूरचे युनिट हेड श्रीराम पी. एस. यांचे हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य गजल मंथन समुहाचे सचिव जयवंत वानखेडे, स्व. वीणा आडेकर साहित्य प्रतिष्ठान, भद्रावतीचे अध्यक्ष प्रवीण आडेकर उपस्थित राहतील तर प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक डॉ. गिरिधर काळे, प्राचार्य डॉ. अनिल मुसळे, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम निब्रड, अभय मुनोत, पोलिस पाटील राहुल आसुटकर,
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष स्वप्निल झुरमुरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सलमा पठाण, ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे उपस्थित राहणार आहे.
          यावेळी महिलांसाठी पारंपारिक खेळ स्पर्धा व प्रेक्षकांसाठी गोंडी ढेमसाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष तथा उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments