महाराष्ट्र वनविभागाचे वाघाच्या शिकाऱ्यांकडे दुर्लक्ष होते काय ? Does the Maharashtra Forest Department ignore the tiger hunters?


आंतरराष्ट्रीय तस्करांचे चंद्रपुर - गडचिरोली धागेदोरे ?

चंद्रपूर (वि. प्रति . ) : नुकतेच १० जुलै ला छत्तीसगढ राज्यातील बिजापुर येथे वाघाचे कातडे पकडल्यानंतर छत्तीसगढ वनविभागाने दोन डझनावर संशयितांना ताब्यात घेऊन वाघाच्या पकडलेल्या चौकशीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील धर्मा नानाजी चापले याला चामड्याच्या कातडी प्रकरणात छत्तीसगड वनविभागाने पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. महत्वाचे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा, कन्हाळगांव, इंद्रावती आणि तेलंगाणा येथील कागल जंगलात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय तस्करांचे धागेदोरे गडचिरोली-चंद्रपूर भागात असल्याचे बोलल्या जात आहे. छत्तीसगड राज्यातील वनविभागाच्या इंद्रावती टायगर रिजर्व्ह पथकाने केलेल्या या कारवाईनंतर महाराष्ट्र वनविभागाचे वाघांच्या तस्करांकडे दुर्लक्ष होत आहे काय ? या चर्चेला पेव फुटले आहे. केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने वाघांच्या शिकारीबाबत यापुर्वी 'रेड अलर्ट' दिला होता. छत्तीसगडच्या बिजापूरपासुन सुरू झालेला या प्रकरणाचा तपास डोंगरगड, सालेकसा, आमगांव, देवरी, साकोली आणि गडचिरोलीपर्यंत येऊन पोहोचला व त्याचे धागेदोरे चंद्रपूरपर्यंत पोहोचले. आमगांव, सालेकसा, देवरीतुन एकंदर २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आत्तापोवतो २५ आरोपींना छत्तीसगड वनविभागाने ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. छत्तीसगड वनविभागाने इंद्रावती टायगर रिझर्व्ह पथकाच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये तपासाचे चक्रे फिरवित महाराष्ट्र राज्यातील आरोपीतांना अटक करीत या प्रकरणाचा छडा लावला असुन आंतरराष्ट्रीय तस्करांचा लवकरचं पर्दाफाश होण्याचे संकेत मिळत असल्याचे सांगण्यात येत असुन महाराष्ट्र वनविभागात मात्र अद्यापपावेतो कोणतीही हालचाल झाली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात असुन महाराष्ट्र वनविभागाचे आंतरराष्ट्रीय तस्करांकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलल्या जात आहे. यापुर्वी कुख्यात आंतरराष्ट्रीय तस्कर संचारबंद वन्यप्राण्यांची शिकार करणारे वनविभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. छत्तीसगड वनविभागाच्या तपासात अनेक बाबी समोर येतील परंतु महाराष्ट्र वनविभागाची या कारवाईनंतर ही कोणतीही हालचाल झाली नसल्यामुळे महाराष्ट्र वनविभागाचे वाघाच्या शिकाऱ्यांकडे दुर्लक्ष होते काय ? अशी चर्चा वन्यजीव प्रेमीमंध्ये होत आहे. वन्य प्राण्यांच्या तस्करांचे जाळे चंद्रपूर-गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यात तर नाही नां ! याविषयी महाराष्ट्र वनविभागाने पाऊले उचलायला हवीत.

राज्यात सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात !

राज्यातील सर्वाधिक वाघांची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली असून, जिल्ह्यात सुमारे २०८ वाघ आहेत. तर एकूणच विदर्भ लँडस्केपमध्ये ४४६ वाघांची नोंद आहे. मागील व्याघ्रसंख्येच्या तुलनेत २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने विदर्भ लँडस्केपचा अहवाल नुकताच प्रकाशित केला. त्यातून ही माहिती समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नऊ एप्रिलला व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर केली. लँडस्केपनुसार व्याघ्रगणनेचा अहवाल एकापाठोपाठ एक प्रकाशित करण्यात येत आहे. त्यात नुकताच विदर्भ लँडस्केपचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यानुसार विदर्भ लँडस्केपमध्ये ४४६, तर चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे २०८ वाघांची नोंद आहे.

राज्यातील वाघांच्या शिकारीची कारणे !

राज्यातील ताडोबा, मेळघाट, पेंच व्याघ्र प्रकल्पात यापुर्वी ही वाघांच्या शिकारी झाल्या आहेत. पट्टेदार वाघांची शिकार करून विदेशात नख, दात, चामडीची तस्करी केली जाते, हे सर्वश्रुत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून व्याघ्रप्रकल्पात शिकारी सुरू आहेत. ही बाब २०१४ मध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश वनविभागाने उघडकीस आणली. त्यानंतर आरोपींचे संबंध नेपाळ, चीन, मलेशियापर्यत असल्याचे उजेडात आले होते. दरवर्षी राज्यात किती वाघांची शिकार झाली, याचा अहवाल राज्याला वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेकडे पाठवावा लागतो.


हे सुद्धा वाचा : 👉👉 चंद्रपूर येथून केली होती आंतराष्ट्रीय तस्कर संचारचंद च्या साथीदारांना अटक !


Post a Comment

0 Comments