पालकमंत्री यांच्या कार्यालयात शहर भाजप ने केली अण्णाभाऊ साठे जयंती साजरी !
चंद्रपूर (का.प्र. ): महाराष्ट्र हे क्रांतिकारकांच्या वारसा जपणारे राज्य आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून क्रांती ची ज्योत जनसामान्यांमध्ये क्रांतीकारी गीतांच्या माध्यमातून रोवली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला पुढे चालायचे आहे, असे मार्गदर्शन उपस्थितांना केले. मंगळवार दि. १ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात जिल्हा महानगर चे नवनियुक्त अध्यक्ष व माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या नेतृत्वात शहर भाजप ने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून साजरी करण्यात आली. तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने माननीय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित होते.
या कार्यक्रमात पुढे बोलताना राहुल पावडे म्हणाले की, एकाच वेळेला विपुल लेखन करणारे अण्णाभाऊ दुसऱ्या बाजूला स्टेज गाजवणारे शाहीर ही होते. तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करणारे प्रतिभावंत होते. . तसंच साहित्यिक, कुशल संघटक, नकलाकार,निष्ठावंत कार्यकर्ता असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. "कल्पनेच्या भराऱ्या मला मारता येत नाही. त्याबाबतीत मी तळ्यातला बेडूक आहे. मी जे जगलो, जे अनुभवलं, ते मी लिहितो." अण्णा भाऊ साठे स्वतःची ओळख अशी करून देत असत.जागतिक पातळीवर कीर्ती पावलेले अण्णाभाऊ हे भारतातील एकमेव शाहीर होते. रशियाचे मॅक्सिम गॉर्की हे अण्णाभाऊंचे लेखनविश्वाचे आदर्श. त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर बसूनच अण्णाभाऊ लिखाण करत असत. या अर्थाने अण्णाभाऊ जागतिक कीर्तीचे कलावंत, लेखक, साहित्यिक होते. असे मार्गदर्शन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीप्रित्यर्थ भाजपचे महानगर अध्यक्ष राहूल पावडे यांनी केले उपस्थितांना केले.
यावेळीराहुल पावडे भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर चंद्रपूर, रामपाल सिंग, तुषार सोम, राजीव गोलिवार, राजेंद्र अडपेवार, राजेंद्र खांडेकर, श्याम कानकम, अरुण तीखे, वंदना तीखे, आशा अबोजवार, सूर्यकांत कुचनवार, रवी लोणकर, संजय निखारे, आकाश ठुसे, सत्यम गाणार, मनोज पोतराजे, चंदन पाल, राकेश बोमनवार, राजेश यादव, रितेश वर्मा, रामकुमार अक्कापलीवार, धम्मप्रकाश भस्मे, अमोल मते इत्यादींची उपस्थिती होती.
0 Comments