धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे झूम अँपद्वारे नाविण्यपूर्ण आयोजन !



  • रमाई महिला मंडळ आणि सम्यक बौध्द मंडळाचा वैशिष्टपूर्ण कार्यक्रम !

चंद्रपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम शोषित लोकांना वर्णवादी व विषमतेवर आधारीत असलेल्या धार्मिक विचारसरणीतून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना स्वाभिमानपुर्ण जीवन जगण्याकरीता सम्यकतत्वांवर अधिष्ठीत सर्वमान्य असलेल्या धम्माचे चक्र गतिमान करण्यासाठी जवळपास तिन लक्ष लोकांना बौध्द धम्माची दिक्षा दिली, तो अविस्मणीय दिवस सर्व जगामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे अशोका विजयादशमी या नावाने दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

परंतू यावर्षी जागतिक महामारी कोविड-१९ च्या जगभर पसरलेल्या साथीमुळे सर्व सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमावर बंदी आली असल्याने रमाई महिला मंडळ आणि सम्यक बौध्द मंडळ, जे. बी. नगर, दाताळा रोड, चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने अशोका विजयादशमी चा ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम झुम अॅप व्दारे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला, त्यांनी दिलेल्या बाविस प्रतिज्ञेला व मानवमुक्तीच्या या लढयास मानवंदना देण्यासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्याच्या प्रक्रियेत सामील होण्याचा संकल्प करण्यासाठी एका वैशिष्टपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुध्दवंदना घेऊन व इंजिनिअर पंकज बन्सोड यांनी बाविस प्रतिज्ञाचे वाचन केले व तद्नंतर आयुष्यमती. सिमा ढोके, आयु. स्वप्निल लवादे व आयु. घडसे यांचे अभिवादन गित आणि नंतर प्रमुख वक्ता म्हणून नागपूर येथिल आंबेडकरी चळवळीत अग्रेसर असलेले मान. अनिरूध्द कांबळे यांनी "भगवान बुध्द आणि पर्यावरण व निसर्ग" या नाविन्यपुर्ण विषयावर आपले विचार व्यक्त केले. शेवटी सम्यक बौध्द मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मान. अशोक काटकर याच्या अध्यक्षिय भाषणाने या कार्यक्रमाची सांगता झाली. या झुम अॅप व्दारे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला वार्डातील जवळपास शंभर संयुक्त कुटुंब सहभागी झाले होते आणि घरी बसुन सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयुष्यमती. स्नेहल चिकटे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनोज सोनटक्के व आभार मान. शैलेन्द्र चिकटे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रमाई महिला मंडळ आणि सम्यक बौध्द मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले. तांत्रिक भार सांभाळण्याचे महत्वाचे कार्यासाठी मान. प्रा. निरज नगराळे व त्यांच्या परिवाराने परिश्रम घेतले. या कार्यक्रमात सहभाग दर्शवून सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोलाचे योगदान दिले, असे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयुष्यमान अशोक काटकर यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments