- तक्रारीच्या माध्यमातून दिला आंदोलनाचा इशारा !
- प्रदुषणामुळे आजारात वाढ !
- प्रदूषण विभागाची भूमिका संशयास्पद !
गडचांदूर : गडचांदूर शहराचे हद्दीत मागील अंदाजे 40 वर्षापूर्वी माणिकगड सिमेंट कम्पनी उदयास आली. अनेक ठिकाणी व जवळपास असलेले अंबुजा सिमेंट आल्याने सभोलताल चे गाव दत्तक घेऊन गावाचा विकास घडवून आणला परन्तु माणिकगड सिमेंट कम्पनी ही एकमेव कम्पनी आहे की, ज्या शहरात सिमेंट उद्योग आहे ते शहर दत्तक तर सोडा उलट डस्ट ,ध्वनीं प्रदूषण करून लोकांच्या जीवाशी खेळत आहे.
मागील कित्येक वर्षापासून या शहरात खास करून साईशांती नगरात फार मोठे डस्ट चे प्रदूषण होत असल्याने तेथिल नागरिकांना घराचे बाहेर निघणे कठीण झाले आहे. या डस्टमुळे घराचे छताचा कुठलाचं उपयोग घेऊ शकत नाही. चार चाकी, दोन चाकी वाहन पूर्णत: डस्टाने खराब झाले आहे. या कालनीत वास्तव्य करणारे नागरिक आता श्वासाचा, फुफुसाचा, डोळ्याचा, त्वचेच्या रोगाने हैराण झाले आहे, असे असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.अश्या कंपणीला पोलुशन सर्टिफिकेट कसे कां दिले जाते ? असा सवाल सुद्धा आम नागरिक करीत आहे.
तेव्हा साईशांती नगरातील शेकडो पुरुष महिला दि 25/10/2020 ला एकत्र येऊन मिटिंग घेतली व या कम्पनी विरुद्ध निवेदन देण्याचे ठरविले तेव्हा दि 26/10/2020 ला डस्ट प्रदूषण बंद करण्याबाबत माणिकगड सिमेंट कंपणीच्या व्यवस्थापक यांना या संदर्भात तक्रार देण्यात आली असून त्याची प्रतिलिपी मा. जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना देण्यात आली व कायम स्वरूपी सदरचे प्रदूषण बंद करण्याबाबतचा नगर परिषदला ठराव मंजूर करून शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबतचे निवेदन मा. नगराध्यक्ष तथा नगर परिषद च्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले जर माणिकगड सिमेंट कम्पनिकडून कायम स्वरूपी डस्ट प्रदूषण बंद न केल्यास साईशांती नगरवासींनी आंदोलनाचा ईशारा दिला आहे. आता ही कंपनी काय निर्णय घेणार व नगर परिषद च्या सभेत विषय घेऊन मंजूर करतील काय ? मंजूर केल्यास शहराच्या नगराध्यक्षा तथा मुख्याधिकारी त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करतील काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी भाजप चे नगरसेवक अरविंद डोहे,अनंताजी रासेकर, घनश्यामजी पाचभाई, महादेवराव कळसकर, रत्नाकरजी लांडे, नुतेश डाखरे, ईशवरजी आत्राम, मिन्नाथ बॉंडे, गिरीधर पानघाटे, वैभव राव आदी उपस्थिती होती.
0 Comments