गडचांदूरतिल मृत जनावरे तर उचलली पण गौ-तस्करीचे काय ?
गडचांदूरतील गौ-तस्करी रॅकेट चा पर्दाफाश व्हावा !

चार जिल्ह्याच्या गौ-तस्करी चा म्होरक्या गडचांदूरात ?

चंद्रपूर (वि.प्रति.) : गडचांदूर शहर येथील अंमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसरात ६ जून रोजी मृत जनावरे आढळून आल्यानंतर नगर गडचांदूर च्या न.प. ने या मृत जनावरांना उचलून त्याची विल्हेवाट लावली परंतु हि जनावरे आली कुठून ? याचा तपास होणे गरजेचे आहे. गडचांदूरतील गौ-तस्करी चे मोठे रॅकेट सक्रिय असून अमलनाला परिसरात जनावरांना ठेवण्यासाठी गोंतस्कराचे गोडाऊन असल्याचे सांगण्यात सांगण्यात येते.

मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक वर्षांपासून गडचांदूर येथे हा व्यवसाय सुरु असून चंद्रपूरचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गो तस्करांवर केलेल्या मोठ्या कारवाईनंतर गो तस्करांनी आपला मार्ग बदलला या मार्गामध्ये आता गडचांदूर हे मुख्य केंद्र असल्याचे सांगण्यात येते. पूर्वी छोट्या प्रमाणात गो हत्या करून विक्री करणारा गाढचांदुरातील एका राजकीय पक्षाच्या व्यापाऱ्याने आता येथे मोठे गोडाऊन बनविले असून चार ते पाच जिल्ह्यातील गो-तस्करीचे तो म्होरक्या असल्याचे सांगण्यात येते. संपूर्ण विदर्भात जनावरे संग्रहित करण्याचा एवढा मोठे गोडाऊन कुठेच नसल्याचे सांगण्यात येते. या गो-तस्करीत काही बड्या व्यक्तींचा समावेश असून मृत जनावरांचा न.प. ने बंदोबस्त केला परंतु हि जनावरे आली कुठून ? तेलंगणात नेताना मृत पावल्यामुळे या जनावरांना या ठिकाणी फेकण्यात आलीत का ?

महत्वाची बाब म्हणजे या गो-तस्करा जवळ पूर्वी खुल्या चारचाकी वाहनावर पारडं किंवा मेन कापड लावून गो-तस्करी केल्या जायची आता पॅकबंद असलेल्या मोठ्या चारचाकी गाड्या ने तेलंगणा मध्ये गो तस्करी होत असल्याचे कळते. या आधी ही असल्याच प्रकारे मृत गोवंश हे इसापूर ग्रामपंचायत हद्दीत टाकली गेली होते. स्थानिकांनी विरोध केल्यावर आता मृत जनावरे ही बैलमपुर शिवारात टाकण्यात आल्याचे कळते. गडचांदूर हे आंतरराज्यिय गोवंश तस्करीचे मोठे केंद्र म्हणून उदयास आले असून वाहतूकी दरम्यान मरण पावलेली जनावरे निर्जन स्थळी टाकण्यात येत असून गो-तस्करीत सहभागी गडचांदूरतिल त्या म्होरक्या चा पोलीस विभागाने अवश्य शोध घ्यावा.

गडचांदूर शहरात सुरु असलेल्या गौ-तस्करीसंदर्भात चंद्रपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी तपास आंतर राज्य स्तरावर होणाऱ्या गो तस्करीचा पर्दाफाश होऊ शकतो एवढे मात्र निश्चित !


राजुरा-गडचांदूर-कोरपना येथे आदिवासी बांधवांच्या जमिनी विक्रीसंदर्भात झालेल्या अन्यायाच्या विरोधात आदिवासी मंत्र्याकडे तक्रारी संदर्भात निडरपणे पुराव्या व कागदपत्रे घेऊन समोर या. 

Post a Comment

0 Comments