गोंडपिपरी चे उपविभागीय अधिकाऱ्यांचे रेती तस्करांशी साटेलोटे ! Sub-divisional officials of Gondpipari have a match with sand smugglers!


राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली विरोधी पक्ष नेते अजितदादा नांवे तक्रार !! (Allegation of NCP, opposition party leader Ajitdada)

चंद्रपूर ( का . प्रति.) : चंद्रपूर जिल्ह्यात गौण खनिजाची विशेषतः रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यात जवळपास ४० रेती घाटाचा लिलाव झालेला आहे. रेती उत्खननासाठी ठरवुन दिलेल्या जागेव्यतिरिक्त अतिरिक्त ठिकाणाहुन मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात जेसीबी व पोकलँड लावुन रेतीचे उत्खनन करणे हे नेहमीचेच झाले आहे. यासंबंधात प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त होतात. प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईचा रेती तस्करांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. १ मार्च पासुन जिल्ह्यात लिलाव झालेल्या रेती घाटावरून उत्खननावर प्रशासनाकडून प्रतिबंध लावण्यात आला आहे, तरी सुद्धा रेती तस्कर मोठ्या प्रमाणात रेती चा उपसा होत आहे. जागेवर पकडले गेले तर कारवाई अन्यथा मोकळी सुट अशी स्थिती आज जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहे. आता तर राष्ट्रवादी काँग्रेसने गोंडपिपरी चे उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढवळे यांचे रेती तस्करांशी थेट संबंध असल्यामुळे त्यांच्या चौकशी करण्यात येवुन त्यांच्यावर आठ दिवसांच्या आत कारवाई करण्यात न आल्यास नवव्या दिवसांपासून आंदोलन करण्याचा इशारा नुकताच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तक्रारीसंदर्भात आता काय कारवाई केली जाते याकडे सामान्यजणांचे लक्ष लागले आहे


*हे सुद्धा वाचा :* 👉👉

काय आहे तक्रार....? (What is the complaint?)

गोंडपिपरी तालुक्यात येनबोथला, कुलथा, हिवरा व आर्वी या चार रेती घाटाचे लिलाव शासनाकडून करण्यात आले असुन या रेतीघाटातुन शासनाने निर्धारित केलेल्या नियत क्षेत्रात रेतीची उचल न करता, नियतक्षेत्राबाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन चालु आहे. गोंडपिपरी येथिल उपविभागीय अधिकारी आपल्या मामाच्या मदतीने रेती तस्करांशी विशिष्ट भ्रमणध्वनी क्रमांकावरून थेट सेटिंग करत असल्याचा सनसनाटी आरोप पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश कवठे यांनी केला, त्यांच्या आरोपांनुसार गोंडपिपरी येथील उपविभागीय अधिकारी संजय कुमार ढवळे हे सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरत आहे, यापूर्वी बल्लारपूर येथे कार्यरत असताना देखिल त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले व यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक तक्रारी होऊन सुद्धा त्यांची कुठलीही चौकशी अथवा कारवाई न झाल्याने त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उपविभागीय कार्यालयात कार्यालयीन कामाकाजासाठी सर्वसामान्य नागरिकांशी हे अधिकारी असभ्य वर्तन करतात. नागरिकांना शुल्लक कामासाठी अनेकदा कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने सर्वसामान्यांची कामे रखडली असून त्यांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय उपविभागीय अधिकारी भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असुन रेती तस्करांशी त्यांचे असलेले अर्थपुर्ण मधुर संबंध पर्यावरण तसेच शासनाचे कोट्यवधीचे नुकसान करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांचे रेती तस्करांशी संगनमत आहे. या घाटातून मोठ-मोठया हायवा (१६ चक्का ट्रक) द्वारे रात्रंदिवस ओवर लोड वाहतूक केली जाते. रेती तस्कराकडून आर्थिक व्यवहार करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी चक्क आपल्या 'मामा' ची नेमणूक केली आहे. तसेच गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी हेसुद्धा गौण खनिज माफियांना आपल्या स्वत:च्या मोबाईल क्रमांकावरून वॉट्सअँप संदेश देतात. या दोन्ही नंबरचा सी. डी. आर. तपासल्यास उपविभागीय अधिकारी व तस्करांशी असलेल्या संबंधाचे बिंग फुटू शकतात अशी मागणी जिल्हाधिकारी मार्फत विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांना केलेल्या निवेदनात केले आहे. सदर रेतीघाटाचे फेर मुल्यांकन करून, सदर अवैध क्षेत्राचे दंड आकारणी संबंधीत अधिकाऱ्याकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे. नियमाबाहय वाहतूक सुरू असतांना एखाद्या अधिकारी वा कर्मचाऱ्याने कारवाई केल्यास उपविभागीय अधिकारी त्यांचेवर दबाव टाकून गाड्या सोडायला भाग पाडतात, असाही आरोप केल्या जात आहे. यावेळी गोंडपिपरी तालुकाध्यक्षासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, राजेंश कवठे तालुका अध्यक्ष, अरुण वासलवार, अरुण बोरकर इत्यादी मंडळी उपस्थित होती. आठ दिवसांत केलेल्या मागणींचे निराकरण न झाल्यास नवव्या दिवसांपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदनाचे पत्र विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्यासमवेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, चंद्रपूर चे पालकमंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार, राजुराचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांना ही देण्यात आले आहे. या प्रकरणात प्रशासनातर्फे काय कारवाई केली जाते याकडे सर्व सामान्यांचे लक्ष लागले आहे.


कोण आहेत लिलाव रेती घाट मालक व काय होणार कारवाई ? (Who are the auction sand ghat owners and what action will be taken?)

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील वैनगंगा नदीवरील येनबोथला रेती घाटाची ८६५७ ब्रास रेती मे. ताज ट्रेडर्स, ताज ट्रान्सपोर्ट, राजुरा यांनी लिलावात हा घाट घेतला आहे. तर अंधारी नदीवरील कुलथा रेती घाटसाठी ३५३४ ब्रास रेती अक्षय सुर्यकांत चांदेकर, रा. चंद्रपूर यांचे नावे, हिवरा गांव - १ येथील हिवरा नाला येथील हिवरा रेती घाट १८५५ ब्रास रेती श्री. किशोर सुर्यभान कुंडगीर, ता. जिवती यांचे नांवे तर वर्धा नदीवरील आर्वी रेती घाट १८५५ ब्रास रेती अक्षय सुर्यकांत चांदेकर, रा. चंद्रपूर यांचे नावे असुन या लिलाव धारकांवर प्रशासनातर्फे काय कारवाई होणार हे बघणे गरजेचे आहे. आत्तापावेतो प्रशासनाकडून रेती तस्करी चे वाहन पकडल्यास त्यांचेवर प्रति ब्रॉस शासन दराप्रमाणे निर्धारित दंड आकारण्यात येत होता व अटकेत असलेले वाहन सुपूर्दनाम्यावर सोडविल्या जात होते. परंतु आता चक्क एका राजकीय पक्षाने नियत क्षेत्रातुन रेतीचे उत्खनन न करता दुसऱ्या क्षेत्रामधुन रेती चे उत्खनन केले आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून काय आणि कोणावर कारवाई केली जाते, हे बघणे महत्वाचे आहे.

Post a Comment

0 Comments