बाबुपेठ येथे पुन्हा नविन देशी दारू दुकानाविरोधात महिलांचा एल्गार ! In Babupeth again, women's protest against the new country liquor shop!


कल्याणी बहुउद्देशीय महिला मंडळाने दिले राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन !

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र डोहणे व सुरेश नारनवरे यांच्या नेतृत्वात देशी दारूदुकान स्थानांतरणाची मागणी!

चंद्रपूर (वि. प्रति.) : चंद्रपूर शहरातील भरगच्च वसलेल्या बाबुपेठ येथील डॉ. आंबेडकर नगर वार्ड, बायपास रोड येथे आशिष शामराव बहादूरे यांचे घरी उस्मानाबाद येथून स्थानांतरण करण्यात येत असुन या देशी दारू दुकानाच्या स्थानांतरणाला या परिसरातील महिलांनी कडाडून विरोध केला आहे. सामाजिक कार्यकर्तेजितेंद्र डोहणे व सुरेश नारनवरे यांच्या नेतृत्वात सदर मंजुर करण्यात आलेले देशी दारू चे दुकान येथून स्थानांतरण करण्यात यावे, यासाठी महिला दिनी ८ मार्च रोजी चंद्रपूर चे जिल्हाधिकारी व चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले असुन सदर देशी दारू दुकानाची मंजुरी त्वरित रद्द करण्यात आली नाही तर बाबुपेठ परिसरातील महिलांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

*हे सुद्धा वाचा :* 👉👉

दारूचा पाश...!

सविस्तर वृत्त असे की, ६ वर्षाच्या जिल्हा दारूबंदीनंतर जिल्ह्यात दारूचे दुकाने सुरू झाले. यापुर्वी बाबुपेठ परिसरात एक देशी दारूचे दुकान व दोन बार कार्यरत होते. दारूबंदी उठल्यानंतर नविन येणारे दारूची दुकानी ही फक्त बाबुपेठ मध्येच परवाना देऊन राज्य उत्पादन शुल्क विभाग बाबुपेठ वासियांच्या जिवीतांशी खेळण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत असुन सदर दुकान त्वरित स्थलांतरित करावे अन्यथा संपूर्ण दलित समाजातर्फे उग्र आंदोलन पुकारण्यात येण्याच्या इशारा कल्याणी बहुउद्देशीय महिला मंडळाने दिलेल्या निवेदनातुन दिला आहे. विशेष बाब म्हणजे बाबुपेठ येथील महात्मा फुले चौक येथे मुंबई येथून स्थानांतरित झालेले सागर देशी बार सुरू झाल्याने येथील महिला तर्फे आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानंतर फक्त १५ दिवसांसाठी ते दुकान बंद ठेवण्यात आले होते व त्यानंतर सदर दारु दुकान पुर्ववत सुरू करण्यात आले आहे. वार्ड वासियांचा विरोध असतांनाही पुर्वी बाबुपेठ येथे लागलेले दारु दुकान आंदोलनानंतर ही योग्य निर्णय घेता बाबुपेठ वार्ड वासियांचा सहनशिलतेचा अंत पाहिल्या जात आहे, आता बायपास मार्गावर नविन देशी दारू दुकानाची परवानगी दिल्यामुळे वार्डवासियांमध्ये आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे बायपास मार्ग हा अत्यंत रहदारीचा मार्ग असुन जड वाहनांची याठिकाणी मोठी वर्दळ असते. होळीच्या दिवशी याच चौकात अपघात होऊन एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असतांना ही बायपास मार्गावर आशिष शामराव बहादुरे यांचे घरी पुन्हा एका देशी दारू दुकानाला परवानगी कशी काय देण्यात आली? असा प्रश्न याठिकाणी उद्भवत आहे. बाबुपेठ हा परिसर कष्टकरी, मजुरांचा असुन दलित वस्ती म्हणून ओळखल्या जाते. बाबुपेठ वस्तीत देशी दारू दुकानाला दिलेली परवानगी त्वरित रद्द करून हे दुकान इतरत्र स्थानांतरित करण्यात यावे, अन्यथा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धोरणाविरोधात आंदोलन पुकारण्यात येण्याचा इशारा कल्याणी बहुउद्देशीय महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. वंदना ढोक, उपाध्यक्ष प्रज्ञा रामटेके, सचिव सिंधु शेंडे, वंदना ढवळे, माया रायपुरे, ताराबाई पिंपळे, उषा रायपुरे, अंजिरा शामकुळे व अन्य शेकडो महिलांनी या निवेदनातुन दिला आहे.

*हे सुद्धा वाचा :* 👉👉

अखेर बाबुपेठ येथील ‘देशी’ दारूचे दुकान नागरिकांच्या रोषानंतर 'कुलूप' बंद !

दारु दुकानांचे नियमबाह्यरित्या वाटप ?

चंद्रपूर जिल्ह्यात मागील सहा वर्षापुर्वी लागलेली दारूबंदी हटल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात नियमबाह्य रित्या दारू दुकानांचे वाटप होत आहे. राज्य उत्पादन शुल्क 'अर्थ' पुर्णरित्या ही दारुची दुकाने देऊन चंद्रपूर जिल्ह्याला दारू विक्रीचे हब बनविण्याच्या कट रचत आहे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कुटील कटाला हाणून पाडु असा इशारा सामाजिक कार्यकर्तेजितेंद्र डोहणे व सुरेश नारनवरे यांनी बोलतांना दिला.

Post a Comment

0 Comments