सा. बां. चे कार्य‌ अभियंता मुकेश टांगले यांच्या युक्तीने....! Function of pwd. With the trick of engineer Mukesh Tangle....!कुलथा घाटावरील रेती तस्करीला बसला तात्पुरता आळा !

चंद्रपूर (वि.प्रति.)

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा या रेती घाटावर मागील काही वर्षापासून जमा असलेली रेती (शिल्लक स्टॉक) उचलण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी सुरू आहे. शिल्लक स्टॉक उचलण्याच्या नावावर रेती तस्करांनी या घाटावर माजविलेल्या उधमामुळे कुलथा रेतीघाट संपूर्ण राज्यात चर्चिला जात आहे. अशातच सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले Mukesh Tangle यांनी शक्कल (युक्ती) लढवित या घाटावरील रेती तस्करांवर तात्पुरता आळा बसवला आहे या शक्कली (युक्ती) ची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे की, गोंडपिपरी तालुक्यात वैनगंगा नदी वाहते. या नदीवर एका मोठ्या पुलियाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ करीत आहे. वैनगंगा नदीवर बांधण्यात येणाऱ्या या पुलियाचा फायदा घेत रेती तस्करांनी पुलियाच्या शेजारीच एक रस्ता निर्माण करीत या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी केली जात होती. ही बाब सा. बां. विभागाचे अभियंता मुकेश टांगले यांच्या लक्षात आल्यानंतर रेती तस्करीवर आळा बसविण्यासाठी टांगले यांनी कंत्राटदाराला बिना परवानगीने उभारण्यात आलेल्या रस्त्याला खोदून काढण्याचे आदेश दिले. टांगले यांनी लढविवलेल्या या शकल्ली (युक्ती) मुळे रेती तस्करांसाठी रेती चोरी करण्याचा हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आल्यामुळे कुलथा घाटावरील सध्या तरी रेती तस्करीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आळा बसला असून रेती तस्कर विवंचनेत पडल्याचे चित्र दिसत आहे. या कृतीमुळे शासनाचा डुबणारा महसूल काही प्रमाणात कां असेना त्यावर अंकुश लागल्यामुळे टांगले यांच्या युक्तीची जिल्ह्यामध्ये प्रशंसा होत आहे. मागील अनेक महिन्यापासून जिल्हा प्रशासन कुलथा रेती घाटावरिल रेती तस्करांवर आळा बसविण्यासाठी प्रयत्नशील होते पण त्यात त्यांना पुरेसे यश मिळाले नाही, टांगले यांच्या शकल्ली (युक्ती) मुळे कुलथा घाटावरील रेती तस्करीला तात्पुरता आळा बसला असला तरी रेती तस्कर मात्र आता काय करावे? या विवंचनेत पडले आहेत.


खालील Link वर click करा व बातमी वाचा.

गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचे रेती तस्करांशी साटेलोटे !


सा. बां. चे कार्य. अभियंता सुनील कुंभे यांना शासनाचा "उत्कृष्ट अभियंता" पुरस्कार जाहिर!


महत्त्वाचे म्हणजे मागील काही महिन्यापूर्वी याच कुलथा रेती घाटावर शेती तस्करांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व सरपंच यांचेवर प्राणघातक हल्जीला करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता हे प्रकरण मंत्रालयात सुद्धा चर्चेला गेले होते. जिल्हा खनीकर्म विभाग जिल्ह्यात होणाऱ्या रेती तस्करीवर आळा बसविण्यात सपशूल अपयशी ठरली असतांनाच हा. बां. विभागाच्या युक्ती मुळे कुलथा रेतीघाटावरील रेती तस्करीवर बसलेल्या अंकुशाची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.

रेती तस्करीवर आळा बसावा व शासनाचा महसूल वाचविण्यासाठी वेळोवेळी नियमामध्ये कठोरता आणली जाते. विविध विभागाचे नियंत्रण यावर असते परंतु आपसी समन्वयाच्या अभावामुळे रेती तस्करी रोखण्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासनाला अपयश येत आहे आणि दिवसेंदिवस रेती तस्करीचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. रेती तस्करांकडून शासकीय अधिकाऱ्यांवर यापूर्वी प्राणघातक हमलेही झाले आहेत. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील सा.बां. विभागाचे टांगले यांनी लढविलेल्या शक्कलीची जिल्ह्यात चांगली चर्चा होऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाने रेती तस्करांवर अंकुश लावण्यासाठी विविध विभागाचा नाविण्यपूर्ण पद्धतीने उपयोग करण्याची संकल्पना जिल्ह्यात राबविल्यास "हे" महाराष्ट्रासाठी मॉडेल ठरू शकेल, यात शंका नाही.

Post a Comment

0 Comments