गडचांदुर शहर झाले गौ-तस्करीचे 'हब' ? Gadchandur city became the 'hub' of cow-trafficking?



गडचांदुरचे ठाणेदार सत्यजित आमले यांची कार्यवाही कौतुकास्पद पण....!

गडचांदुरातील गौ-तस्करीचा पर्दाफाश होणे गरजेचे !


गडचांदुर (प्रति . )

गडचांदुर पोलिसांनी अवैधपणे जनावरांची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनांमधुन गुरूवार दि. २२ रोजी ११ जनावरांची सुटका करून तिन आरोपींना अटक केली. गडचांदुरचे ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात बैलमपुर रोडवर नाकाबंदी करून ही केलेली ही कारवाई अभिनंदनास पात्र आहे. परंतु गडचांदुर शहर गौ-तस्करीचे हब बनले असुन त्याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

यापुर्वी जुन २०२२ रोजी गडचांदुर शहरातील पर्यटन स्थळ असलेल्या अमलनाला धरणामध्ये मृत बेवारस जनावरे आढळली होती. त्या बेवारस जनावरां चा गडचांदूर न.प. ने बंदोबस्त केला होता, त्यावेळी पोलिसांनी ती बेवारस जनावरे आली कुठून व एकाएकी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती अमलनाला धरणात फेकण्यात आली कशी ? याची चौकशी केली असती तर  गडचांदुर शहरात गौ-तस्करीचे राज्य स्तरीय रॅकेट चा पर्दाफाश झाला असता. मिळालेल्या माहितीनुसार गडचांदूर शहरातचं गौ-तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत असुन तेलंगाणा सिमेला लागून असलेले गडचांदुर शहर हे गौ- तस्करीचे 'हब' बनत असुन त्याचा तपास "गडचांदूरतिल मृत जनावरे तर उचलली पण गौ-तस्करीचे काय ?” व गडचांदूरतिल मृत जनावरे तर उचलली पण गौ-तस्करीचे काय ? या आशयाचे वृत्त आमच्या वृत्त चॅनेलच्या माध्यमातुन ९ जून २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले होते.

 अमलनाला परिसरात आढळली मृत जनावरांची चौकशी व्हावी !

https://www.vidarbhaathawadi.in/2022/06/animalsmuggle.html

गडचांदूरतिल मृत जनावरे तर उचलली पण गौ-तस्करीचे काय ?

https://www.vidarbhaathawadi.in/2022/06/smuggle-animal_8.html

मिळालेल्या माहितीनुसार काही राजकीय पक्षाचा बुरखा पांघरून गडचांदुर शहरातील काही युवक या रॅकेट मध्ये सक्रिय असुन हे रॅकेट राज्य स्तरावर कार्यरत असल्याची माहिती आहे. याचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे. गडचांदुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक, जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक प्रविण परदेशी यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments